BREAKING NEWS:
महाराष्ट्र हेडलाइन

राम तेरी गंगा मैली हो गयी, खुद के पाप धोते धोते! :- महेंद्र कुंभारे,

Summary

मुंबई:- चक्रधर मेश्राम विभागीय प्रतिनिधी. दि.14 मे. 2021 ऐतिहासिक महत्त्व प्राप्त असलेली, देशातील जनतेच्या भावना जीच्याशी जोडल्या गेलेल्या आहेत अशी गंगा नदी आज बदनाम झाली आहे. एकेकाळी गंगाजल प्रत्येकाच्या घरात ठेवणे पवित्र मानले जायचे. मृत्यूसमयी दोन घोट गंगाजल त्या व्यक्तीच्या […]

मुंबई:- चक्रधर मेश्राम विभागीय प्रतिनिधी. दि.14 मे. 2021
ऐतिहासिक महत्त्व प्राप्त असलेली, देशातील जनतेच्या भावना जीच्याशी जोडल्या गेलेल्या आहेत अशी गंगा नदी आज बदनाम झाली आहे. एकेकाळी गंगाजल प्रत्येकाच्या घरात ठेवणे पवित्र मानले जायचे. मृत्यूसमयी दोन घोट गंगाजल त्या व्यक्तीच्या तोंडात पडले की त्याला मोक्ष प्राप्त होईल असे समजले जायचे. आज त्याच गंगामाईचे पाणी शेकडो माणसांच्या सडलेल्या शव ने दूषित झाले आहे. त्या शवांवर मासे, कुत्र्यांनी ताव मारला आहे. याच गंगानदीला स्वच्छ करण्यासाठी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडणूकीपुर्वी आणि नंतरही करोडो रूपयांचा निधी खर्च करण्याची घोषणा केली होती. मात्र, नेहमीचे येती पावसाळा या उक्तीप्रमाणे ही घोषणाही अखेर घोषणाच ठरली. गंगानदी तर स्वच्छ झाली नाहीच पण आज वेगळ्याच कारणाने ती चर्चेला आली आहे.
बिहारच्या बक्सर जिल्ह्यातील गंगा नदीत शेकडो मृतदेह वाहून आल्याचे विदारक तितकेच ह्रदयद्रावक आणि मन हेलावून टाकणारे दृष्य सर्वांनी पाहिले. सदरचे मृतदेह अक्षरशः सडुन गेले असून त्यावर मासे आणि कुत्र्यांनी ताव मारलेला पहायला मिळाले. हे मृतदेह कोरोनाने मृत पावलेल्या व्यक्तींचे असून ते उत्तरप्रदेशातून वाहत आल्याचे बिहारच्या एका मंत्र्याचे म्हणणे आहे. *आपल्या घरची व्यक्ती मृत झाल्यानंतर तिची विधी आणि अत्यंसंस्कार करण्यासाठी पैसे नसणे हे डिजिटल इंडियाला शोभणारे नाही. शिवाय आपल्या प्रिय व्यक्तीला कोणी असे पाण्यात फेकुन देईल का? हा सर्वात मोठा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांचे मृत्यू होणे आणि अशा प्रकारे त्यांच्या देहाची विटंबना होणे हे संतापजनकच आहे. पण, जनतेच्या मृतांच्या टाळूवरील लोणी खाणा-या आणि संवेदना हरपलेल्या सरकारला त्याचे काहीच सोयरसुतक दिसत नाही. ऊठसठ फालतु प्रकरणात सी.बी.आय., ई.डी., ची चौकशी लावणाऱ्या सरकारने याचा जलद शोध लावणे अत्यंत गरजेचे आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या सर्व आमदारांना वाय आणि झेड प्रकारच्या सुरक्षा प्रदान करणाऱ्या केंद्रातील भाजप सरकारने गंगानदीच्या या संवेदनशील प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. हि त्यांची नैतिक जबाबदारीच आहे.
बरे झाले महाराष्ट्रातील एखादा ओढा, नाला, नहर, उपनदी, नदी गंगेला मिळत नाही. नाहीतर इथल्या मराठी भैय्यांनी महाराष्ट्र सरकारची अब्रू वेशीवर टांगून नेहमीप्रमाणे थयथयाट केला असता. उत्तरप्रदेश, बिहार, प.बंगाल हि राज्ये भारतात असून तेथील राज्य सरकार केंद्राकडे काहीही मागणी करु शकतात. आणि केंद्र सरकार तिथे जातीने लक्ष देण्यात तत्परही असतो. फक्त महाराष्ट्र हेच राज्य भारतात नसून ह्यांनी काही मागणी केली की, केंद्र सरकार उत्तर देण्याच्या आधीच येथील बिनकामाचे नेते, अंडभक्त आणि मराठी भैये उत्तर देण्यासाठी पुढे सरसावतात. हेच महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. अणाजी पंतांची पिलावळ, वंशज अजूनही जिवंत आहेत याची ते नेहमीच साक्ष देत असतात. प्रभू श्रीरामाच्या नावाचा आसरा घेऊन राजकारण करणाऱ्या राजकारण्यांनी हे नेहमी लक्षात ठेवावे की, जनतेला अन्न, वस्त्र, निवारा आणि हाताला काम हवे आहे. प्रभू श्रीरामचंद्रा बद्दल श्रध्दा त्यांच्या मनात आहे. त्यामुळे धर्माच्या नावाने राजकारण करण्याचे दिवस आता संपले आहे. समाज आता जागृत होत चालला आहे. बरे-वाईट, खरे-खोटे हे समजाला समजू लागले आहे. आणि समाज जितका जागृत होईल तितके राजकारण्यांना राजकारण करणे भारी पडणार आहे. म्हणून बिहारच्या बक्सर जिल्ह्यातील गंगा नदीच्या पात्रात जी भयंकर घटना घडली आहे याचा तातडीने शोध घेऊन ,नेमके काय घडले आहे ते जनतेसमोर आणणे तितकेच महत्त्वाचे आणि गरजेचे आहे. इतकेच रामाची गंगा तुमच्या पापाने आधीच मैली झाली आहे. तिला अजून मैली करण्यापेक्षा ती स्वच्छ कशी होईल याकडे लक्ष केंद्रित करा इतकेच!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *