BREAKING NEWS:
महाराष्ट्र हेडलाइन

राज हत्याकांड प्रकरणाला फास्ट ट्रैक कोर्टात चालविण्याची मागणी कन्हान शहर विकास मंच चे कन्हान पोलीस स्टेशन मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन.

Summary

कन्हान : – नागपुर एमआईडीसी थाना अंतर्गत एका हत्याराने १५ वर्षीय मुलाचे अपहरण करून त्याची हत्या केल्याने कन्हान शहर विकास मंच पदाधिका-यां नी या घटनेचा जाहिर निषेध करित कन्हान पोलीस स्टे शनचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्फत राज्याचे मुख्य मंत्री मा. […]

कन्हान : – नागपुर एमआईडीसी थाना अंतर्गत एका हत्याराने १५ वर्षीय मुलाचे अपहरण करून त्याची हत्या केल्याने कन्हान शहर विकास मंच पदाधिका-यां नी या घटनेचा जाहिर निषेध करित कन्हान पोलीस स्टे शनचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्फत राज्याचे मुख्य मंत्री मा. उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठवुन हत्याकांड चा आरोपीवर कडक कारवाई करून या प्रकरणाला फास्ट ट्रैक कोर्ट मध्ये चालविण्याची मागणी केली.
गुरवार (दि.१०) जुन ला सायंकाळच्या सुमारास आरोपी सुरज शाहु या इसमाने मृतक राजकुमार पांडे या १५ वर्षीय मुलाला क्रिकेट खेळण्यासाठी बतावणी करून मुलाचे दुचाकी वाहनाने अपहरण केले. काही वेळेनंतर आरोपीने मृतक राज च्या पालकांना फोन करून सांगितले की सुटका पाहिजे असेल तर राजच्या मोठ्या वंडिलांचे शरीर कापुन मोबाईल व्हाट्सएप फोटो पाठवा अशी आरोपीने मागणी केली होती.फोटो व्हाट्सएप वर न पाठवल्याने आरोपीने मुलाची हत्या केली. या घटनेमुळे जिल्ह्यातल्या व शहरातल्या लहान मुलांन मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असुन नागरिकां मध्ये पोलीस प्रशासना विरुद्ध तिव्र रोष निर्माण होत असल्याने कन्हान शहर विकास मंच च्या पदाधिका-यानी या घटनेचा जाहिर निषेध करित मंच उपाध्यक्ष ऋृषभ बावनकर यांच्या नेतृत्वात कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरूण त्रिपाठी यांचा मार्फत राज्याचे मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठवुन हत्याकांड चा आरोपी विरूध्द कडक कारवाई करून या प्रकरणाला फास्ट ट्रैक कोर्टात चाल विण्याची मागणी केली आहे. तसेच नागपुर जिल्ह्यात व शहरात हत्याचे प्रमाण दिवसेदिवस वाढत असल्याने नागरिकांचे जिवन जगणे कठीण झाले असुन पोलीस प्रशासना विरुद्ध तिव्र रोष निर्माण होत आहे. त्यामुळे जिल्ह्यात व शहरात वाढत असलेले गुन्हेगारांचे प्रमाण कमी व्हावे याकरिता पोलीस प्रशासनांनी गुन्हेगारी व गुन्हेगारांवर अकुंश लावण्या करिता योग्य उपाय योज ना राबवुन गुन्हेगारांना पकडुन कडक कारवाई करण्या ची मागणी केली आहे. याप्रसंगी कन्हान शहर विकास मंच उपाध्यक्ष ऋृषभ बावनकर, सचिव प्रदीप बावने, कांद्री ग्राम पंचायत सदस्या अरुणा हजारे, कोषाध्यक्ष हरीओम प्रकाश नारायण, सदस्य शाहरुख खान, सुषमा मस्के, पौर्णिमा दुबे, हर्षाली नागपुरकर सह मंच पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *