BREAKING NEWS:
महाराष्ट्र हेडलाइन

राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते जाधव एज्युटेकच्या नविन कार्यालयाचा उद्घाटन संपन्न

Summary

जाधव एज्युटेक प्रा. लि.च्या प्रोझन ट्रेड सेंटर,प्रोझोन मॉल औरंगाबाद येथील नविन कार्यालयाचा उद्घाटन राज्याचे महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते संपन्न झाले.पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क मराठवाडा प्रतिनिधी शेख चांद जाधव एज्युटेक प्रा.लि. शिक्षण क्षेत्रात काम करणारी संस्था आहे विशेषत […]

जाधव एज्युटेक प्रा. लि.च्या प्रोझन ट्रेड सेंटर,प्रोझोन मॉल औरंगाबाद येथील नविन कार्यालयाचा उद्घाटन राज्याचे महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते संपन्न झाले.पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क मराठवाडा प्रतिनिधी शेख चांद

जाधव एज्युटेक प्रा.लि. शिक्षण क्षेत्रात काम करणारी संस्था आहे विशेषत परदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन संस्था करते आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक शिक्षणाचे दारे उघडे करुन देण्यात जाधव एज्युटेकचे फार मोठे योगदान राहिलेले आहे असे प्रतिपादन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी या प्रसंगी केले. जाधव एज्युटेकने आपल्या नविन कार्यालयाच्या माध्यमातून विद्यार्थी तसेच पालकांना वैद्यकीय शिक्षणाचं दालन खुले करुन दिले आहे त्यासाठी ना. अब्दुल सत्तार यांनी संस्थेला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाला जाधव एज्युटेकचे संचालक डॉ. विठ्ठल जाधव, सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती नंदकिशोर सहारे, सुशिल रगडे, जाधव हॉस्पिटलचे संचालक डॉ. बाबासाहेब जाधव, डॉ. प्रफुल्ल जटाळे,डॉ. अशोक गायकवाड, डॉ. शेखर दौड, डॉ. संतोष शिंदे, डॉ. योगेश जाधव, डॉ. आकाते,सुभाष जाधव सुखदेव जाधव विशाल खोडके आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *