BREAKING NEWS:
महाराष्ट्र हेडलाइन

राजे धर्मराव हायस्कूल अडपल्ली(माल) येथील 14 विद्यार्थिनींना सायकल वाटप सावित्रीच्या लेकींचा प्रवास सुकर

Summary

आष्टी:-दरवर्षी शासनातर्फे मानव विकास मिशन योजने अंतर्गत 5 की.मी.च्या आतील गावावरून शाळेत शिक्षणासाठी ये जा करण्याकरिता मुलींना सायकलींचा लाभ दिला जातो. या योजनेअंतर्गत राजे धर्मराव हायस्कूल अडपल्ली(माल) येथील 14 विद्यार्थीनींना सायकली मंजूर झाल्या त्या सायकलींचे वाटप लाभार्थी विद्यार्थीनिंना करण्यात आले. […]

आष्टी:-दरवर्षी शासनातर्फे मानव विकास मिशन योजने अंतर्गत 5 की.मी.च्या आतील गावावरून शाळेत शिक्षणासाठी ये जा करण्याकरिता मुलींना सायकलींचा लाभ दिला जातो. या योजनेअंतर्गत राजे धर्मराव हायस्कूल अडपल्ली(माल) येथील 14 विद्यार्थीनींना सायकली मंजूर झाल्या त्या सायकलींचे वाटप लाभार्थी विद्यार्थीनिंना करण्यात आले.
अडपल्ली माल येथे तुमडी, मलकापूर, बामनपेठ, मललेझरी,वसंतपुर इत्यादी ठिकाणाहून विद्यार्थिनी ये जा करित आसतात. मंजूर सायकलींचे वाटप लाभार्थी मुलींना करण्यात आल्यामुळे त्यांचा प्रवास सुखकर झाला. याप्रसंगी सर्व मुलींनी आनंद व्यक्त केला.याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री एन.एस.बोरकुटे, प्रमुख उपस्थिती म्हणून मलेझरी,अडपल्ली, तुमडी, गुंडापल्ली, मलकापूर, सोमनपल्ली या सहा गावच्या गटग्रामपंचायतच्या सरपंच्या तथा शाळा व्यवस्थापन व विकास समिती सदस्यासौ. रेखाताई प्रकाश कन्नके(kannake) मलेझरी, श्री विजू मांदाडे ग्रामपंचायत सदस्य व अध्यक्ष ग्राम शिक्षण समिती अडपल्ली हे प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच श्री अनिल आत्राम,श्री राजू धुरके व अरुण कोरडे मलेझरी आदी पालकसुद्धा हजर होते. तसेच श्री के. बी. गोविंदवार, श्री जे ए शेख, श्री एस टी ब्राह्मणकर,श्री एम एम सरकार, श्री एच पि तामगाडगे आदी शिक्षक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जेष्ठ शिक्षक श्री के पि मंडल यांनी केले तर आभारप्रदर्शन श्री एन डब्ल्यू शहारे यांनी मानले.
कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी श्री दिवाकर गेडाम लिपिक ,श्री लालचंद झाडे व श्री पिटाले यांनी मोलाचे सहकार्य केले.

प्रा शेषराव येलेकर
गडचिरोली
जिल्हा प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *