महाराष्ट्र हेडलाइन

राजुऱ्यात वीज पडून महिलेचा मृत्यू आज दुपारी दोन वाजताची घटना

Summary

आज दुपारी दोन वाजताच्या दरम्यान पावसाने हजेरी लावली. आज दुपारी अचानक आलेल्या पावसामुळे येथील रेल्वे पुला लगतच्या शेतात काम करीत असलेल्या भाग्यश्री धनराज वाढई या 30 वर्षीय महिलेवर वीज पडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. राजुरा शहरातील अंबादास नगर येथील धनराज […]

आज दुपारी दोन वाजताच्या दरम्यान पावसाने हजेरी लावली. आज दुपारी अचानक आलेल्या पावसामुळे येथील रेल्वे पुला लगतच्या शेतात काम करीत असलेल्या भाग्यश्री धनराज वाढई या 30 वर्षीय महिलेवर वीज पडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. राजुरा शहरातील अंबादास नगर येथील धनराज वाढई हे पत्नीसह रेल्वे पुला लगतच्या शेतात काम करीत होते. त्याचवेळी दुपारी दोन वाजताच्या सुमारास विजेच्या कडकडासह जोरदार पाऊस सुरू झाला व पत्नी भाग्यश्री धनराज वाढई ही झोपडीकडे जात असतानाच तिच्या अंगावर वीज पडली. यात तिचा जागीच मृत्यू झाला. मृतक महिलेला 6 ते 7 वर्षाचे दोन मुले आहे. तिच्या मृत्यूमुळे कुटूंबावर शोककळा पसरली आहे.

विक्की नगराळे
तालुका व चंद्रपुर
शहर प्रतिनिधी
चंद्रपुर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *