महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

राजभवन येथील ‘अटल उद्यान’ आणि ‘जैव विविधता’ प्रकल्पाचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन

Summary

मुंबई, दि.२६ : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज प्रजासत्ताक दिनानिमित्त राजभवन येथे नव्याने निर्माण करण्यात आलेल्या ‘अटल उद्यान’ प्रकल्पाचे उद्घाटन तसेच नव्याने प्रस्तावित जैवविविधता प्रकल्पाच्या कोनशिलेचे देखील अनावरण केले. दिवंगत प्रधानमंत्री भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मृती प्रित्यर्थ राजभवनात ‘अटल उद्यान’ […]

मुंबई, दि.२६ : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज प्रजासत्ताक दिनानिमित्त राजभवन येथे नव्याने निर्माण करण्यात आलेल्या ‘अटल उद्यान’ प्रकल्पाचे उद्घाटन तसेच नव्याने प्रस्तावित जैवविविधता प्रकल्पाच्या कोनशिलेचे देखील अनावरण केले.

दिवंगत प्रधानमंत्री भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मृती प्रित्यर्थ राजभवनात ‘अटल उद्यान’ बनविण्यात आले असून ते जपानी गार्डनच्या संकल्पनेवर आधारित तयार करण्यात आलेले आहे.

राजभवन येथे भेट देणाऱ्या देशीविदेशी पाहुण्यांकरिता तसेच नागरिकांकरिता ‘अटल उद्यान’ व जैव विविधता प्रकल्प आकर्षण ठरणार आहे.

राजभवनातील प्रस्तावित जैव विविधता प्रकल्प यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ व महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या सहकार्याने तयार करण्यात येणार आहे.

000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *