म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य रोगाव्यतिरिक्त इतरही बुरशीजन्य आहेत रोग.
Summary
मुंबई प्रतिनिधी:- अलिकडेच म्युकरमायकोसिस नावाचा बुरशीजन्य आजार कोरोना रूग्णांमध्ये आढळून येत आहे. खरेतर कोव्हिड-१९ पूर्वीपासून हा आजार आहे. या आजाराला हिंदीत काला फफूंद तर इंग्रजीत ‘ब्लॅक फंगस’ म्हणतात. पण याव्यतिरिक्त इतरही बुरशीजन्य आजार आहेत. त्याबद्दलही जाणून घेऊन उपाययोजना करणे आवश्यक […]
मुंबई प्रतिनिधी:- अलिकडेच म्युकरमायकोसिस नावाचा बुरशीजन्य आजार कोरोना रूग्णांमध्ये आढळून येत आहे. खरेतर कोव्हिड-१९ पूर्वीपासून हा आजार आहे. या आजाराला हिंदीत काला फफूंद तर इंग्रजीत ‘ब्लॅक फंगस’ म्हणतात. पण याव्यतिरिक्त इतरही बुरशीजन्य आजार आहेत. त्याबद्दलही जाणून घेऊन उपाययोजना करणे आवश्यक आहे.
नायटा हा आजार बुरशीमुळे होतो. याची मुख्य कारणे अस्वच्छता, दमटपणा, पाण्याची टंचाई, एकमेकांचे कपडे वापरणे इत्यादींमुळे होतो. हा आजार कंबर, पोट, मांड्या, जांघा इत्यादी भागात जास्त प्रमाणात होण्याची शक्यता आहे. नायटा व त्यासारखे चामडीचे बुरशीजन्य इतर विकार सांसर्गिक असल्यामुळे एकाकडून दुसऱ्याला लवकर होतात. अशा वेळी डॉक्टरांचा योग्य सल्ला घेऊन हा आजार बरा होतो.
फंगल इन्फेक्शन ही त्वचेची समस्या आहे. जसं चपाती किंवा ब्रेडवर वातावरणातील बदलामुळे बुरशी लागते. तसाच प्रकार त्वचेबाबतही होतो. हा बदल दमट हवेमुळे होतो. त्याचप्रमाणे वातावरणातील बदल आणि दमट हवेमुळे आपल्या अंगावर घाम येतो. हा घाम त्वचेच्या माध्यमातून कपड्यात शिरतो. त्यामुळे त्वचेवर बुरशी येण्यास अनुकूल असे वातावरण तयार होण्यास मदत होते. ही समस्या साधारणतः उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात येते. असे झाल्यास स्वतःच्या मनाने कोणतेही उपचार न घेता त्वचा रोग तज्ज्ञांकडून योग्य मार्गदर्शन आणि उपचार घ्यावे.
सोरायसीस हा देखील त्वचेचा आजार आहे. सोरायसीसची लक्षणं म्हणजे शरीरावर लाल चट्टे येतात आणि त्यावर पांढरी खपली तयार होते. हे चट्टे टाळू, तळहात, तळपाय किंवा शरीराच्या कुठल्याही भागावर येतात. या चट्ट्यांना खाज येते. हा आजार आनुवंशिक ही असू शकतो. ऐकीव उपचार करण्याऐवजी तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावे.
कोड हा त्वचेमधील रंग तयार करणाऱ्या पेशींचा आजार आहे. या रंग तयार करणाऱ्या पेशी वेगवेगळ्या कारणांमुळे निष्क्रिय होतात आणि रंग तयार करणं बंद करतात. त्यामुळे शरीरावर पांढरे चट्टे पडतात. हा आजार होण्यामागचे मुख्य कारण म्हणजे आपल्या रक्तातील पांढऱ्या पेशी रंग तयार करणाऱ्या पेशींना कमी करतात. हा आजार आनुवंशिक ही असू शकतो. या प्रकारच्या रूग्णांनी उन्हापासून शरीराचे संरक्षण करावं. तसंच अंधश्रद्धेने कोणतेही उपचार न करता त्वचारोग तज्ज्ञांकडून योग्य मार्गदर्शन आणि उपचार घ्यावेत.
उष्णतेमुळे अंगावर घामोळ्या किंवा लाल पुरळ उठणं आणि त्वचेच्या त्या भागावर खाज सुटणं ही समस्या बऱ्याचदा घामामुळे उद्भवते. यावर उपाय म्हणजे तुम्ही या भागावर नखांनी खाजवलं नाही तर ही पुरळ लवकर बरी होऊ शकतात. त्वचेवरची खाज कमी करण्यासाठी कॅलामाईन लोशनचा वापर तुम्ही करू शकता. दमट दिवसांत सुती आणि सैलसर कपडे वापरासाठी घ्यावी.