BREAKING NEWS:
महाराष्ट्र हेडलाइन

मुस्लिम बांधवांनी घरच्या घरी केली रमजान ईद साजरी रमजान ईद निमित्य कन्हान शहर विकास मंच व्दारे मुस्लिम बांधवांना वृक्ष व गुलाबाचे फुल भेट

Summary

*नागपूर* कन्हान : – शहरात दरवर्षी रमजान ईद मोठ्या उत्सा हाने साजरी करण्यात येत असुन या कोरोना प्रादुर्भाव संकटामुळे मुस्लिम बांधवांनी घरच्याघरी अत्यंत साधे पणाने रमजान ईद साजरी करण्यात आल्याने कन्हान शहर विकास मंच अध्यक्ष, पदाधिका-यांनी मुस्लिम बांधवांकडे जाऊन वृक्ष […]

*नागपूर* कन्हान : – शहरात दरवर्षी रमजान ईद मोठ्या उत्सा हाने साजरी करण्यात येत असुन या कोरोना प्रादुर्भाव संकटामुळे मुस्लिम बांधवांनी घरच्याघरी अत्यंत साधे पणाने रमजान ईद साजरी करण्यात आल्याने कन्हान शहर विकास मंच अध्यक्ष, पदाधिका-यांनी मुस्लिम बांधवांकडे जाऊन वृक्ष व गुलाबाचे फुल देऊन रमजा न ईद च्या शुभेच्छा देत ईद उत्सव साजरा केला.
शुक्रवार दि.१४ मे २०२१ ला रमजान ईद निमित्य कन्हान शहरात मुस्लिम बांधवांनी कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेत मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन न करता शासनाच्या नियमावलीचे काटेकोरपणे पालन करीत मस्जिद मध्ये जास्त गर्दी न करता सामाजिक अंतराचे पालन करून सार्वजनिक नमाज करण्यात आला. मुस्लिम बांधवांसाठी रमजान महिना पवित्र असतो. मात्र कोरोनामुळे संपुर्ण रमजान महिन्याभर घरीच राहुन नमाज करण्यात आले. ईदच्या दिवशी सामुहिक नमाज करून एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात परंतु यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे मुस्लिम बांधवांनी शासनाच्या नियमावली चे काठेकोरपणे पालन करून घरच्याघरीच अत्यंत साधेपणाने रमजान ईद साजरी करण्यात आली. रमजान ईद निमित्याने कन्हान शहर विकास मंच च्या पदाधिका-यानी मंच अध्यक्ष प्रविण गोडे यांचे हस्ते पोलीस उपविभागीय कामठी कार्यालय कन्हान येथे पोलीस उपविभागीय अधिकारी मुक्तार बागवान यांना बदामाचे वृक्ष देऊनं ईद च्या शुभेच्छा दिल्या. तसेच मुस्लिम बांधवांच्या घरोघरी जाऊन गुलाबाचे फुल भेट देऊन रमजान ईद च्या शुभेच्छा देत रमजान ईद उत्साहत साजरी केली. याप्रसंगी कन्हान शहर विकास मंच अध्यक्ष प्रविण गोडे, उपाध्यक्ष ऋृषभ बावनकर, सचिव प्रदीप बावने, शाहरुख खान, रजनिश मेश्राम सह मंच पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. या रमजान ईद निमित्य शहरात शांतता व सुव्यवस्था राहावी म्हणुन पोलीसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता.

✍🏼संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
9579998535

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *