महाराष्ट्र हेडलाइन

मुख्यमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत मोफत अन्नधान्य वाटपाचा मा .आमदार (माजी गृह मंत्री) श्री अनिलबाबू देशमुख यांचे हस्ते शुभारंभ

Summary

वार्ताहर-कोंढाळी/काटोल देशातील कोविड-19 या विषाणूच्या उद्रेकामुळे उद्भवलेल्या आर्थिक अडचणींमुळे गरीब आणि गरजू लोकांना सामना कराव्या लागणाऱ्या अडचणी कमी करण्यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत माहे मे 2021 करिता देण्यात येणारे नियमित अन्नधान्य मोफत वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे, […]

वार्ताहर-कोंढाळी/काटोल
देशातील कोविड-19 या विषाणूच्या उद्रेकामुळे उद्भवलेल्या आर्थिक अडचणींमुळे गरीब आणि गरजू लोकांना सामना कराव्या लागणाऱ्या अडचणी कमी करण्यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत माहे मे 2021 करिता देण्यात येणारे नियमित अन्नधान्य मोफत वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे, तसेच केंद्र सरकारने पुढील 2 महिने अर्थात मे आणि जून 2021 या कालावधीसाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013 (एनएफएसए) अंतर्गत समावेश असणाऱ्या लाभार्थींना दरमहा माणसी 5 किलो मोफत धान्य वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. आधीच्या “प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजने (पीएम -जीकेवाय)” च्या धर्तीवरच हे वाटप केले जाणार आहे.
या योजनेंतर्गत काटोल तालुक्यातील 1 लक्ष 29 हजार लाभार्थ्यांना 5 किलो मोफत अन्नधान्य देण्यात येणार आहे. जागतिक महामारी कोव्हिड च्या या कठीण काळात समाजातील प्रत्येक घटकाची सेवा करण्यास केंद्र व राज्य सरकार वचनबद्ध आहे”
या विशेष योजनेअंतर्गत (पीएमजीकेएवाय) अंत्योदय अन्न योजना (एएवाय) आणि प्राधान्य गृहकर्मी (पीएचएच) या दोन्ही प्रवर्गांतर्गत सुमारे 1 लक्ष 29 हजार एनएफएसए लाभार्थ्यांना, एनएफएसए च्या दरमहा नियमित मिळणाऱ्या धान्याव्यक्तिरिक्त माहे मे व जून 2021 मध्ये माणसी 5 किलो अतिरिक्त मोफत धान्य (तांदूळ/गहू) देण्यात येणार आहे.
अशी माहीती काटोल तालुका अन्न व नागरी पुरवठा अधिकारी कमलेश कुंभरे यांनी ०५ मे रोजी काटोल चे आमदार व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतलेल्या कोविड प्रतिबंधात्म आढावा बैठकीदरम्यान दिली, व या प्रसंगी दोन लाभार्थींना या योजनेअंतरगत गेहू व तांदळाचे आमदारांचे हस्ते वाटप ही करण्यात आले, या प्रसंगी जि प सदस्य चंद्रशेखर कोल्हे, माजी जि प उपाध्यक्ष चंद्रशेखर चिखले, पं स सदस्य संजय डांगोरे, नागमोते, काटोल उपविभागीय आपत्ती व्यवस्थापन विभाग के अध्यक्ष श्रीकांत ऊंबरकर व आपत्ती व्यवस्थापन विभाग,तहसीलदार अजय चरडे, उपविभागीय पोलीस अधिकारी नागेश जाधव, नायब तहसीलदार निलेश कदम, राजेंद्र जंवजाळ, ना त टिपरे, केशवराव धुर्वे, स्वप्निल व्यास, संजय राऊत, अजय लाडसे, काटोल ग्रामिण रूग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी डाक्टर सुधीर वाघमारे, काटोल तालुका आरोग्य अधिकारी डाक्टर शशांक व्यव्हारे,तहसील अन्न व नागरी पुरवठा अधिकारी कमलेश कुंभरे बी डी ओ संजय पाटील व अन्य पदाधिकारी कोविड १९चे सोशल डिस्टंस्सींग चे पुर्ण पालन करत उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *