मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ज्येष्ठ बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांना श्रद्धांजली
Summary
मुंबई, दि. २८ : ज्येष्ठ बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे. आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्राचा लौकिक नंदू नाटेकर यांनी उंचावला. त्यांच्या कामगिरीमुळे क्रीडा क्षेत्राला झळाळी मिळाली. तरूणांना या क्षेत्रात येण्यासाठी प्रेरणा मिळाली. होतकरू […]
मुंबई, दि. २८ : ज्येष्ठ बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे.
आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्राचा लौकिक नंदू नाटेकर यांनी उंचावला. त्यांच्या कामगिरीमुळे क्रीडा क्षेत्राला झळाळी मिळाली. तरूणांना या क्षेत्रात येण्यासाठी प्रेरणा मिळाली. होतकरू खेळाडूंसाठी ते आदर्श ठरले. त्यांच्या निधनामुळे क्रीडाक्षेत्रातील मार्गदर्शक असं व्यक्तिमत्त्व हरपले आहे. नाटेकर यांचे क्रीडा क्षेत्रातील योगदान महाराष्ट्राच्या चिरंतन स्मरणात राहील. महाराष्ट्र सुपुत्र, महान खेळाडू नंदू नाटेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.