महाराष्ट्र हेडलाइन

मुंबई महापालिकेच्या मदतीला बॉलिवूडकर सरसावले, कोव्हिड रुग्णालयासाठी अजय देवगणकडून 1 कोटींची देणगी

Summary

मुंबई : पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क ला माहीती मिळाल्याप्रमाने राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे थैमान पाहायला मिळत आहे. वाढती रुग्णसंख्या, कोलमडलेली आरोग्य यंत्रणा, सोयी-सुविधा, औषधोपचार यासर्व गोष्टींवर ताण आला आहे. याच पार्श्वभूमीवर सर्व स्तरावरुन मदतीचे हात पुढे येत असताना बॉलिवूडकरांनाही मदतीचा […]

मुंबई : पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क ला माहीती मिळाल्याप्रमाने राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे थैमान पाहायला मिळत आहे. वाढती रुग्णसंख्या, कोलमडलेली आरोग्य यंत्रणा, सोयी-सुविधा, औषधोपचार यासर्व गोष्टींवर ताण आला आहे. याच पार्श्वभूमीवर सर्व स्तरावरुन मदतीचे हात पुढे येत असताना बॉलिवूडकरांनाही मदतीचा हात पुढे केला आहे. बॉलिवूड अभिनेता अजय देवगणसह अनेक बॉलिवूडकरांना पुन्हा एकदा कोरोनाबाधितांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.
शिवाजी पार्कात कोव्हिड सेंटर
मुंबईत दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत अनेक ठिकाणी कोव्हिड सेंटर उभारले जात आहे. मुंबईतील दादर परिसरात कोरोनाबाधितांवर उपचार व्हावा यासाठी छत्रपती शिवाजी महाराज मैदान परिसरातील मुंबई महानगरपालिकेने कोविड एचडीयू रुग्णालय उभारले आहे. शिवाजी पार्कमधील स्‍काऊट-गाईड हॉलमध्‍ये 20 रुग्‍णशय्या क्षमतेचे हे रुग्णालय आहे. हे रुग्णालय उभारण्यासाठी अजय देवगण मदत करत आहे.

अजय देवगणकडून 1 कोटींची देणगी
या रुग्णालयात व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजन सपोर्ट आणि इतर सुविधांचा समावेश असणार आहे. या कोव्हिड सेंटरसाठी अजय देवगण त्याची NY फाऊंडेशन या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आर्थिक मदत करणार आहेत. नुकतंच NY फाऊंडेशनने सामाजिक उत्‍तरदाय‍ित्‍व म्‍हणून 1 कोटी रुपयांची देणगी महानगरपालिकेकडे सुपूर्द केली आहे.
हिंदुजा रुग्णालयातील डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार

इतकचं नव्हे तर गेल्यावर्षी धारावीत उभारलेल्या कोव्हिड सेंटरसाठी अजय देवगण 200 बेडसाठी विनाशुल्क ऑक्सिजन सिलेंडर आणि दोन पोर्टेबल व्हेंटिलेटरची व्यवस्था करुन दिली होती. यामुळे आता हिंदुजा रुग्णालयातच दाखल होण्याची इच्छा असणाऱ्या रुग्णांना महापालिकेच्या या रुग्णालयात हिंदुजाच्या डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार घेता येणार आहे.

अनेक बॉलिवूडकरांकडून मदतीचा हात
दरम्यान पालिकेच्या बिझिनेस डेव्हलपमेंट सेलच्या स्मायली अकाऊंटमध्ये अजय देवगणसोबतच बोनी कपूर, समीर नायर, रजनिश खानुजा, दीपक धर, तरुण राठी, अशीम प्रकाश बजाज, लीना यादव, आर. पी. यादव, लव रंजन, आनंद पंड‍ित यांसह अनेक कलाकारांनी मदतीचा वाटा उचलला आहे. त्यामुळे आतापर्यंत यात एक कोटी रुपयांहून अधिक रक्कम जमा झाली आहे.

प्रवीण मेश्राम
उत्तर नागपुर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *