नागपुर महाराष्ट्र हेडलाइन

मुंबई (ठाणे) येथील महिलेला लुटणाऱ्या आरोपीला कोंढाळी पोलीसांनी आठ तासातच घेतले ताब्यात महिलेजवळील दोन लाख रुपये लुटणारा आरोपी कोंढाळी पोलीसांच्या जाळ्यात कोंढाळी नजीकच्या कुंडी येथील घटना

Summary

कोंढाळी वार्ताहर =:-०३सप्टेबर नागपूर कोंढाळी अमरावती राष्ट्रीय महामार्गा लगत स्वस्त दरात जमिन मिळवून देतो म्हणत ओळखीच्या इसमाने मुंबई ( ठाणे ) येथील महिलेला व त्यांच्या वाहन चालकाला मारहाण करुन व दोन लाख रुपये लुटमार करुन पसार झाल्याची घटना नागपुर जिल्ह्याच्या […]

कोंढाळी वार्ताहर =:-०३सप्टेबर
नागपूर कोंढाळी अमरावती राष्ट्रीय महामार्गा लगत स्वस्त दरात जमिन मिळवून देतो म्हणत ओळखीच्या इसमाने मुंबई ( ठाणे ) येथील महिलेला व त्यांच्या वाहन चालकाला मारहाण करुन व दोन लाख रुपये लुटमार करुन पसार झाल्याची घटना नागपुर जिल्ह्याच्या कोंढाळी पोलीस स्टेशन हद्दीतील कुंडी परीसरात शुक्रवार 2 सप्टेबर च्या सायंकाळी 6 च्या सुमारास घडली. माञ कोंढाळी पोलीसाच्या अथक प्रयत्नामुळे 8 तासातच मुख्य आरोपीत ला कोंढाळी पोलीसांना पकडण्यात यश आले.
मिळालेल्या माहिती प्रमाणे घडलेली माहिती महिलेने पोलीसांच्या 112 डायल क्रमांकावर दिली असता कोंढाळी पोलीसांना महिलेकडून दोन लाख रुपये लुटण्याची व मारहाण केल्याची तक्रार मिळताच कोंढाळीचे ठाणेदार पंकज वाघोडे आपल्या सहकार्यासह त्वरित घटनास्थळ गाठले या प्रकरणी माहिती अशी की मुंबई ठाणे येथील महिला नूरजहाँ मन शेट्टी 45 या महिलेकडे मागील चार वर्षांपूर्वी नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्याच्या रामठी गावातील रमेश गुलाबराव चव्हाण 45 व त्यांचे कुटुंब हे नूरजहाँ शेट्टी यांच्या मुंबई ठाणे येथील मत्स्यपालनाच्या कामावर नोकरीला होते रमेश चव्हाण सदर महिलेकडे अनेक वर्ष नोकरी केल्यामुळे त्यांचे कौटुंबिक संबंध होते या दरम्यान आरोपीत रमेश चव्हाण यांनी नूरजहाँ यांना नागपूर मुंबई राष्ट्रीय महामार्गा लगत कमी दरात शेती खरेदी करून देतो म्हणून सांगितले. रमेश चव्हाण हा विश्वासातील असल्यामुळे नुरजहाँ यांनी नागपूर जिल्ह्यात शेती घेण्यास होकार दिला असता टोकन रक्कम घेऊन येण्याचे सांगितले यावरुन नुरजहाँ 1 सप्टेंबरला मुंबई ठाणे वरुन चार चाकी क्रमांक एम एच 01- बीजी -3261 या वाहनाने आपल्या चालकासह 2 सप्टेबर ला सायंकाळी 6 च्या दरम्यान कोंढाळी गाठले असता रमेश चव्हान याने नागपुर कडे 4 कि.मी. चमेली गावाकडे येण्यास सांगितले तेव्हा रमेश चव्हाण याने वाहनाला हात देऊन कुंडी फाट्यावर थांबविले असता महिला नुरजहाँ यांना रक्कम आणली का म्हणून विचारपुस केली असता त्यांनी होकार दिला तेव्हा रमेश ने तेथून 200 मीटर अंतरावर शेती असल्याचे सांगून कुंडी गावाकडील रस्त्यावर नेले व एका शेताजवळ नेऊन उभे केले याच दरम्यान रमेश चव्हाण यांचे साथीदार तीन दुचाकी वर सहा व्यक्ती बसुन घटना स्थळावर आले व अचानक प्लास्टिकच्या दांड्याने नुरजहाँ 45 व चालक राज बहादुर वर्मा 37 यांना मारहाण करून व त्यांच्या कडील असलेली दोन लाख रुपयेची रक्कम व सोबत कारची चावी हिसकावून पळ काढला.
या घटनेची माहिती मिळताच ठाणेदार पंकज वाघोडे व त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहोचले घटनेची संपूर्ण माहिती घेऊन वरिष्ठांना कळविले या प्रकरणी नागपूर जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, अप्पर पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर, उपविभागीय पोलिस अधिकारी नागेश जाधव, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस अधिकारी ओम प्रकाश कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढाळीचे नाव नियुक्त ठाणेदार पंकज वाघोडे, पोलीस उपनिरीक्षक राम ढगे, देवेंद्र सोनावले, मीना बारंगे, पो. ह.रणजीत जाधव, नापोशी संतोष राठोड, पन्नालाल बटाऊवाले, प्रशांत काळे, प्रशांत कुंभरे, सोमेश्वर वाईलकर, विकास धनगर यांची दोन पथके तयार करून ठाणेदारांनी पुढे तपास सुरू केला व आठ तासातच मुख्य आरोपीत रमेश चव्हान याचा शोध घेत याला ताब्यात घेतले.
मुंबई ठाणे वरून आलेल्या नुरजहाँ यांच्या तक्रारीवरून आरोपीच्या शोधकामी कोंढाळी पोलिसांनी आठ तासात मुख्य आरोपीत ला ताब्यात घेत गुन्हा नोंदविला असुन पुढील तपास ठाणेदार पंकज वाघोडे करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *