BREAKING NEWS:
देश नई दिल्ली मनोरंजन महाराष्ट्र हेडलाइन

‘माणगाव परिषद – १९२०’ माहितीपटाचा सामाजिक न्याय दिनानिमित्त प्रिमियर महाराष्ट्र परिचय केंद्राच्या समाज माध्यमांवर होणार थेट प्रसारण

Summary

नवी दिल्ली, दि. २३- माणगाव परिषदेच्या १०१ वर्षपूर्तीनिमित्त तयार करण्यात आलेल्या ‘माणगाव परिषद १९२०’ या माहितीपटाचा सामाजिक न्यायदिन या लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जन्मदिनी (२६ जून) प्रिमियर होत आहे. महाराष्ट्र परिचय केंद्राच्या समाज माध्यमांवर या माहितीपटाच्या प्रिमियरचे थेट प्रसारण होणार आहे. […]

नवी दिल्ली, दि. २३- माणगाव परिषदेच्या १०१ वर्षपूर्तीनिमित्त तयार करण्यात आलेल्या ‘माणगाव परिषद १९२०’ या माहितीपटाचा सामाजिक न्यायदिन या लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जन्मदिनी (२६ जून) प्रिमियर होत आहे. महाराष्ट्र परिचय केंद्राच्या समाज माध्यमांवर या माहितीपटाच्या प्रिमियरचे थेट प्रसारण होणार आहे.

कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर जिल्हा माहिती कार्यालयाने या माहितीपटाची निर्मिती केली आहे.

तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली पटकथा…

कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार,  इंद्रजित सावंत, डॉ. अशोक चौसाळकर, डॉ.आलोक जत्राटकर यांच्या मार्गदर्शनाखाली या माहितीपटाची संहिता, पटकथा करण्यात आली आहे. श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी माहितीपटाच्या चित्रीकरणासाठी न्यू पॅलेसमध्ये तीन दिवस शूटिंगसाठी परवानगी दिली होती. पुणे येथील रिडीफाईन कॉन्सेप्ट्स संस्थेने हा माहितीपट बनवला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील माणगाव येथे १९२० साली ही परिषद झाली होती. “तुम्ही तुमचा पुढारी शोधून काढला, त्याबद्दल मी तुमचे अंतःकरणपूर्वक अभिनंदन करतो. माझी खात्री आहे की, डॉ.आंबेडकर हे तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाहीत. इतकेच नव्हे तर अशी एक वेळ येईल की ते सर्व हिंदुस्थानचे पुढारी होतील”, असे सार्थ उद्गार राजर्षी शाहू महाराजांनी २२ मार्च १९२० रोजी माणगाव येथील अस्पृश्य समाजाच्या परिषदेत काढले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुकनायक वृत्तपत्रातील मजकूर आणि ज्येष्ठ संशोधकांच्या साहित्यातील संदर्भावरून या माहितीपटाची निर्मिती करण्यात आली आहे.

२६ जून रोजी परिचय केंद्राच्या समाज माध्यमांहून थेट प्रिमियरचे प्रसारण…

छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीदिनी शनिवारी, २६ जून २०२१ रोजी महाराष्ट्र  परिचय केंद्राच्या अधिकृत ट्विटरहँडल , फेसबुक आणि युट्यूब चॅनेलहून ‘माणगाव परिषद १९२०’ या माहितीपटाच्या प्रिमियरचे थेट प्रसारित होणार आहे. जास्तीत-जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत  आहे. हे प्रसारण परिचय केंद्राचे मराठी  ट्विटर हँडल https://twitter.com/MahaGovtMic,

 

हिंदी ट्विटर हँडल  https://twitter.com/MahaMicHindi ,

इंग्रजी ट्विटर हँडल  https://twitter.com/micnewdelhi यावर लाईव्ह पाहता येणार आहे.

तसेच, या कार्यालयाचे फेसबुक प्रोफाईल

https://www.facebook.com/MICNEWDELHI

फेसबुक पेज https://www.facebook.com/micnewdelhiPR/   आणि

फेसबुक मिडीया ग्रुप https://www.facebook.com/groups/525576297610799/?ref=share

यू ट्यूब

https://www.youtube.com/c/MahaInfoCentreNewDelhi  युटयूब चॅनेल वर पाहता येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *