*महिला दिनाचे दिवशी* *लायन्स क्लबच्या वतीने नवजात शिशुना ब्लँकेटचे वाटप*
स्थानिक शासकीय महिला व बाल रुग्णालय गडचिरोली येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून 8 मार्च रोजी 33 नवजात शिशु ना लायन्स क्लब गडचिरोलीच्या वतीने ब्लॅकेट चे वाटप करण्यात आले यावेळी लायन्स क्लबच्या अध्यक्ष प्रा. संध्या येलेकर, सचिव लॉ मंजुषा मोरे, उपाध्यक्ष लॉ प्रवीण भामानी, लॉ सुचिता कामडी, लॉ शालिनी कुमरे, लॉ शिवानी येलेकर आदी लॉयन सदस्य उपस्थित होते.
स्थानिक महिला रुग्णालयात येणाऱ्या महिला ह्या बहुतांश गरीब आणि कष्टकरी वर्गातल्या असतात. दवाखान्यात त्यांना आवश्यक सर्व सुविधा प्रशासनाच्या वतीने पुरविल्या जातात. परंतु घरी गेल्यानंतर मात्र अठराविश्वे दारिद्र्य त्यांच्या नशिबी असते . लायन्स क्लब गडचिरोलीच्या वतीने दरवर्षी नवजात बालकांना ब्लॅंकेट वाटपाचा कार्यक्रम महिला रुग्णालयात घेतला जातो. आणि त्या माध्यमातून त्यांना मायेची ऊब देण्याचा प्रयत्न केला जातो. स्थानीक महिला व बाल रुग्णालय लायन्स क्लब गडचिरोली ने दत्तक घेतले असून क्लबच्यावतीने येथे महिलांसाठी व बालकांसाठी नेहमी विविध उपक्रम राबविले जातात, यापूर्वी रुग्णांच्या नातेवाईकांसाठी सुसज्ज विश्रामगृह, रक्तदान शिबिर, कोरोणाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शानीटायझर व मॉस्कचे वितरण,महिलांसाठी सनिटरी नपकिन चे वितरण करून सामाजिक उत्तरदायित्व जोपासण्याचा प्रयत्न केला आहे.
गडचिरोली
जिल्हा प्रतिनिधी
प्रा शेषराव येलेकर