शिक्षण हेडलाइन

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सरळ वरच्या वर्गात प्रवेश देण्यात यावा – पदवीधर महासंघ

Summary

अमर वासनिक/न्यूज एडिटर अंतिम वर्षातील कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये अशी योजना विद्यापीठाने आखावीमहाविद्यालयीन विद्यार्थ्यांना वरच्या वर्गात प्रवेश मिळण्यासाठी प्रक्रिया राबविण्यात यावी. विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम व महाविद्यालय प्रशाशनामध्ये  संदिग्धता राहू नये याकरिता विद्यापीठाने पुढाकार घ्यावा. वरच्या वर्गात प्रवेश मिळत असताना […]


अमर वासनिक/न्यूज एडिटर

अंतिम वर्षातील कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये अशी योजना विद्यापीठाने आखावी
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना वरच्या वर्गात प्रवेश मिळण्यासाठी प्रक्रिया राबविण्यात यावी. विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम व महाविद्यालय प्रशाशनामध्ये  संदिग्धता राहू नये याकरिता विद्यापीठाने पुढाकार घ्यावा. वरच्या वर्गात प्रवेश मिळत असताना विद्यार्थ्यांना कुठल्याही एटीकेटीच्या नियमांची अडचण येऊ नये. त्याचप्रमाणे शिक्षणात खंड पडला असल्यास अशा विद्यार्थ्यांना देखील, त्या खंडाचा विचार न करता, वरच्या वर्गात प्रवेश द्यावा अशी स्पष्ट सूचना विद्यापीठामार्फत देण्यात यावी. 
कोविड आजाराच्या पार्श्वभूमीवर आधीच मानसिक खच्चीकरण झालेल्या पालक व विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी विद्यापीठाने कार्यवाही करणे अपेक्षित आहे व विद्यार्थ्यांना सरळ वरच्या वर्गात प्रवेश देणे गरजेचे आहे. कुठल्याही विद्यार्थ्याला प्रवेशापासून महाविद्यालयांनी वंचित ठेवू नये. प्रवेशप्रकिया सुलभ व्हावी यासाठी प्रयत्न करावे तसेच अंतिम वर्षातील कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये अशी योजना विद्यापीठाने आखावी असे आवाहन पदवीधर महासंघातर्फे करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांना काही अडचणी असल्यास संपर्क साधावा… महेंद्र निंबार्ते, भंडारा 7700000707
माजी सिनेट तथा व्यवस्थापन परिषद सदस्य,रा.तु.म. नागपूर विद्यापीठ अध्यक्ष, पदवीधर महासंघ,विदर्भ प्रदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *