महाराष्ट्र विधिमंडळ रोहयो समितीने केली पाच तालुक्यातील कामांची पाहणी
Summary
चंद्रपूर, दि. 2 सप्टेंबर : महाराष्ट्र विधिमंडळ रोजगार हमी योजना समिती जिल्ह्यात गुरुवारी दाखल झाली. समितीप्रमुख मनोहर चंद्रिकापुरे यांच्या नेतृत्वात समितीच्या सदस्यांनी पाच तालुक्यातील 21 ग्रामपंचायती अंतर्गत रोजगार हमी योजना तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामांची पाहणी […]
चंद्रपूर, दि. 2 सप्टेंबर : महाराष्ट्र विधिमंडळ रोजगार हमी योजना समिती जिल्ह्यात गुरुवारी दाखल झाली. समितीप्रमुख मनोहर चंद्रिकापुरे यांच्या नेतृत्वात समितीच्या सदस्यांनी पाच तालुक्यातील 21 ग्रामपंचायती अंतर्गत रोजगार हमी योजना तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामांची पाहणी केली.
सदर समितीने बल्लारपूर तालुक्यातील कळमना, किन्ही, इटोली, गिलबिली आणि कोर्टीमक्ता, राजुरा तालुक्यातील सुमठाणा, सोनुर्ली, देवाडा आणि येरगव्हाण, कोरपना तालुक्यातील कठोली, मायां आणि सोनुर्ली, भद्रावती तालुक्यातील चेकबराज, मागली, खोकरी (आग्रा), बोरगाव फाटा ते आग्रा, चंदनखेडा, आष्टा आणि वडाळा, वरोरा तालुक्यातील आनंदवन, भटाळा येथे भेट दिली. या भेटीदरम्यान समितीच्या सदस्यांनी रोपवाटिका, फळबाग लागवड, गुरांचा गोठा, वृक्षलागवड, बोडी खोलीकरण, अभिसरण, शोष खड्डे, गट लागवड, घरकुल, रस्ता दुतर्फा, स्मशानभुमी शेड बांधकाम आदी कामांची पाहणी केली.
जिल्ह्यात दाखल झालेल्या समितीमध्ये समितीप्रमुख आमदार सर्वश्री मनोहर चंद्रीकापुरे यांच्यासह राजेश पाटील, नरेंद्र दराडे, अमोल मिटकरी, दादाराव केचे, रामदास आंबटकर, विक्रमसिंह सावंत, शिरीष चौधरी, समीर कुणावार, दिलीप बोरसे, राजेश राठोड आदींचा समावेश आहे.