BREAKING NEWS:
महाराष्ट्र मुंबई रोजगार हेडलाइन

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २८ एप्रिल व १९ मे रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलली

Summary

मुंबई, दि. २१ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे २८ एप्रिल, २०२४ रोजी होणारी महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४, १९ मे, २०२४ रोजी होणारी समाज कल्याण अधिकारी, गट-ब आणि इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट-ब या सरळसेवा चाळणी परीक्षा […]

मुंबई, दि. २१ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे २८ एप्रिल, २०२४ रोजी होणारी महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४, १९ मे, २०२४ रोजी होणारी समाज कल्याण अधिकारी, गट-ब आणि इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट-ब या सरळसेवा चाळणी परीक्षा पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. या परीक्षांच्या सुधारित तारखा यथावकाश जाहीर करण्यात येतील.

सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरिता अधिनियम, २०२४ मधील आरक्षणाच्या तरतुदी विचारात घेता, शासनाकडून सुधारित आरक्षण निश्चिती प्राप्त झाल्यानंतर उपरोक्त नमूद परीक्षांच्या बाबतीतील पुढील घोषणा आयोगातर्फे करण्यात येणार असल्याचे आयोगामार्फत कळविण्यात आले आहे.

0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *