BREAKING NEWS:
महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

मतदार यादी, मतदान केंद्रासंदर्भात माहितीसाठी हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध मुंबई शिक्षक व मुंबई पदवीधर विधान परिषद मतदारसंघ निवडणूक २०२४

Summary

मुंबई, दि. २४: भारत निवडणूक आयोगाने अधिसूचनेद्वारे मुंबई पदवीधर व मुंबई शिक्षक मतदारसंघाचा द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. बुधवार, २६ जून, २०२४ रोजी मतदान होणार आहे. मतदारास मतदार यादी संदर्भात तसेच मतदान केंद्रासंदर्भात माहिती देण्यासाठी हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून देण्यात […]

मुंबई, दि. २४: भारत निवडणूक आयोगाने अधिसूचनेद्वारे मुंबई पदवीधर व मुंबई शिक्षक मतदारसंघाचा द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. बुधवार, २६ जून, २०२४ रोजी मतदान होणार आहे. मतदारास मतदार यादी संदर्भात तसेच मतदान केंद्रासंदर्भात माहिती देण्यासाठी हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

मतदारास मतदार यादी संदर्भात तसेच मतदान केंद्रासंदर्भात माहिती देण्यासाठी https://gterollregistration.mahait.org/GTRoll/Search ही लिंक तसेच 022 69403398 आणि 022 69403396 हे हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या हेल्पलाईनद्वारे मतदाराचे नाव कुठल्या केंद्रात आहे किंवा नाही याबाबत माहिती देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. असे निवडणूक शाखेकडून कळविण्यात आले आहे.

सोमवार १ जुलै, २०२४ रोजी मतमोजणीची प्रक्रिया आगरी कोळी संस्कृती भवन, सेक्टर-२४. नेरुळ (पश्चिम), नवी मुंबई येथे पार पडणार आहे.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *