BREAKING NEWS:
नागपुर महाराष्ट्र हेडलाइन

मतदारानों! आपले नाव मतदार यादीत तपासून घ्या –

Summary

वार्ताहर -काटोल /कोंढाळी आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदानापासून कोणताही मतदार वंचित राहू नये, त्यांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी जिल्हा प्रशासन कामाला लागले आहे. भारत निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत 6 ऑगस्ट 2024 रोजी प्रारुप मतदार यादी […]

वार्ताहर -काटोल /कोंढाळी
आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदानापासून कोणताही मतदार वंचित राहू नये, त्यांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी जिल्हा प्रशासन कामाला लागले आहे. भारत निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत 6 ऑगस्ट 2024 रोजी प्रारुप मतदार यादी नागरिकांच्या अवलोकनासाठी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, मतदान केंद्र तसेच https://chanda.nic.in/ या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी आपले नाव मतदार यादीत आहे की नाही, हे तपासून घ्यावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी तथा काटोल विधानसभा निवडणूक अधिकारी पियुष चिवंडे यांनी केले आहे.
उपविभागीय कार्यालयात राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींसोबत आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी काटोल चे तहसीलदार राजू रणवीर, नरखेड चे तहसीलदार व निवडणूक सह अधिकारी (निवडणूक) यांच्यासह
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार),काँग्रेस, शिवसेना (शिंदे गट), शिवसेना (उबाठा गट), शे का प, रिपाइ, आप, भारतीय कम्युनिस्ट पक्ष या राजकीय पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
विशेष संक्षिप्त कार्यक्रमांतर्गत 25 जून ते 5 ऑगस्ट या कालावधीत मतदारांची पडताळणी करण्याकरीता मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडून घरोघरी भेट देणे, मतदान केंद्राचे सुसुत्रीकरण / पुनर्रचना करणे, मतदार यादीतील त्रृटी दूर करणे, मतदारांचे अस्पष्ट असलेले छायाचित्र अद्ययावत करणे, मतदार याद्यांचे मुद्रण करणे इत्यादी उपक्रम राबविण्यात आले. याबाबत प्रारुप मतदार यादी नागरिकांच्या अवलोकनासाठी 6 ऑगस्ट रोजी प्रसिध्द करण्यात आली. नागरिकांनी आताच आपले नाव मतदार यादीत तपासून घ्यावे. तसेच भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सुधारीत वेळापत्रकानुसार 6 ते 20 ऑगस्ट या कालावधीत प्रत्येक मतदान केंद्रावर दावे व हरकती स्वीकारण्यात येणार आहे, असे उपविभागीय अधिकारी पियुष चिवंडे यांनी सांगितले.
*विशेष शिबिरांचे आयोजन*
काटोल विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक मतदान केंद्रावर दि. 10,11,17 आणि 18 ऑगस्ट 2024 रोजी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. या शिबिरामध्ये सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत मतदारांना संबंधित मतदान केंद्रावर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे दावे व हरकती दाखल करता येवू शकेल.
*राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींना आवाहन*: आगामी महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत नागरिकांना आपल्या मतदानाचा हक्क बजावता यावा याकरीता नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करणे, मतदान केंद्रस्तरीय अधिका-यांना सहाय्य करण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी जिल्ह्यातील प्रत्येक मतदान केंद्राकरीता प्रतिनिधींची नेमणूक करावी. तसेच सर्व राजकीय पक्षांनी त्यांच्या क्षेत्रातील मतदार यादी त्रृटीरहित ठेवण्यासाठी सर्व पात्र मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ठ करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी पियुष चिवंडे यांनी केले आहे.
जिल्ह्यातील काटोल विधानसभ मतदारांची एकूण संख्या :
४८-काटोल (पुरुष140735 , स्त्री-135098, इतर06, एकूण मतदार -275839 आहेत, आणि काटोल विधानसभा मतदारसंघातील 16मतदार केंद्राचे स्थानात बदल केला आहे. 328मतदान केंद्र होत यात सावळी खु,काटोल शहर,बोरडोह तसेच रामपूर माल असे चार नविन मतदान केंद्रांची वाढ होऊन 332 मतदान केंद्र आहेत.
या प्रसंगी राजकिय पक्षांचे प्रतिनिधी ‌व काटोल तहसीलदार राजू रणवीर , नरखेड तहसीलदार उमेश खोडके —- तसेच सह निवडणूक अधिकारी ‌संजय भुजाडे, भागवत पाटील, विजय डांगोरे, सुनिता चल्लावार,मनिष चरडे उपस्थित होते.
०००००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *