भारत-चीन सिमेवर ४५ वर्षांनी गोळीबार!
Summary
भारत-चीनमधील तणावाची परिस्थिती चिघळत चालली आहे. पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) गोळीबाराची घटना घडल्याचे वृत्त सोमवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास वृत्तसंस्थेने दिले. गेल्या तीन महिन्यांपासून या सीमेवर तणावाच्या अनेक घटना घडल्या आहेत. भारतीय लष्कराने पँगाँग त्सो सरोवरच्या दक्षिण किनाऱ्यावरील डोंगररांगांतील […]
भारत-चीनमधील तणावाची परिस्थिती चिघळत चालली आहे. पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) गोळीबाराची घटना घडल्याचे वृत्त सोमवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास वृत्तसंस्थेने दिले. गेल्या तीन महिन्यांपासून या सीमेवर तणावाच्या अनेक घटना घडल्या आहेत. भारतीय लष्कराने पँगाँग त्सो सरोवरच्या दक्षिण किनाऱ्यावरील डोंगररांगांतील महत्त्वाची ठाणी काबीज केली होती. यामुळे चिनी सैनिकांनी चुशुल भागात घुसखाेरीचा प्रयत्न केला होता. तो भारतीय लष्कराने उधळून लावला होता. दरम्यान, चिनी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने दावा केला की, भारतीय सैनिकांनी घुसखाेरीचा प्रयत्न केला. तसेच गस्त घालणाऱ्या चिनी सैनिकांना हवेत गोळीबार करून इशारा दिला. स्थिती आटोक्यात आणण्यासाठी चिनी लष्करानेही प्रत्युत्तर दिले.
१९७५ : अरुणाचलमध्ये हल्ला
२० ऑक्टोबर १९७५ राेजी चीनने अरुणाचल प्रदेशच्या तुलुंग घुसखोरी करून भारतीय गस्त पथकावर हल्ला केला. यात ४ जवान शहीद झाले होते. त्यानंतर ४५ वर्षांनी भारत-चीन सीमेवर गोळीबाराची घटना घडली.