महाराष्ट्र हेडलाइन

भाजपाच्या वतीने नेर येथे जागतीक योग दिन साजरा आयुर्वेद तज्ञ डॉ अनुप पांडे यांनी केले मार्गदर्शन प्रा. उदय कानतोडे यांनी योगासने, शरीरशास्त्र याविषयी दिली सविस्तर माहिती

Summary

यवतमाळ ,पोलीस योद्धा वृत्त सेवा. भारतीय जनता पक्षाचे वतीने जागतिक योग दिन स्थानिक विठ्ठल मंदिर नेर येथे 21 जून रोजी साजरा करण्यात आला. यवतमाळ जिल्हा भारतीय जनता पक्ष आध्यत्मिक आघाडीचे अध्यक्ष शंतनुराव शेटे यांनी भारतीय जनता पक्ष शिक्षक आघाडीचे जिल्हा […]

यवतमाळ ,पोलीस योद्धा
वृत्त सेवा.
भारतीय जनता पक्षाचे वतीने जागतिक योग दिन स्थानिक विठ्ठल मंदिर नेर येथे 21 जून
रोजी साजरा करण्यात आला.
यवतमाळ जिल्हा भारतीय
जनता पक्ष आध्यत्मिक आघाडीचे अध्यक्ष शंतनुराव शेटे
यांनी भारतीय जनता पक्ष शिक्षक
आघाडीचे जिल्हा संयोजक प्रा.
उदय कानतोडे यांच्या कडे नेर
तालुका योग दिवस संयोजक
म्हणून जबाबदारी सोपविली
होती.
प्रा. उदय कानतोडे यांनी
उपस्थितांना योगासने, प्राणायम,
विविध मुद्रा , शरीर रचना व शरीर
शास्त्र याविषयी सविस्तर माहिती दिली विविध आसनांचे प्रात्यक्षिक
सादर केले.
गार्गी मनीष राऊळकर व सानिका दतोपंत भोयर या तरुणींनी यामध्ये सहभाग घेवून
काही योगासनांची उत्तम प्रात्यक्षिके सादर केले.
यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष
श्री अनिल राठोड ,जेष्ठ कार्यकर्ते
विलासराव राखडे ,निलेश राठोड
यांची या कार्यक्रमात विशेषत्वाने
उपस्थिती होती.
आयुर्वेद तज्ञ डॉ. अनुप पांडे
यांनी यावेळी मार्गदर्शन केले. दिनेश पांगारकर यांनी आभार प्रदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *