भंडारा जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे पेट्रोल-डिझेल ,गॅस व खाद्य तेल दरवाढीचे निषेध व भाववाढ कमी करण्याबाबत मोर्चा काढून मा.श्री. नरेंद्रजी मोदी प्रधानमंत्री भारत सरकार यांना मा.जिल्हाधिकारी भंडारा मार्फत निवेदन देण्यात आले.
Summary
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्या तेलाच्या किमती कमी असून सुद्धा केंद्र सरकार काही महिण्यापासून पेट्रोल ,डिझेल,गॅस ची सतत दरवाढ करत आहे,खाद्य तेलाचे भाव तर गगनाला भिडले आहेत. महागाई मुळे देशातील सामान्य जनता,शेतकरी व मोलमजुरी करणाऱ्या लोकांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची झाली आहे.त्यामुळे […]

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्या तेलाच्या किमती कमी असून सुद्धा केंद्र सरकार काही महिण्यापासून पेट्रोल ,डिझेल,गॅस ची सतत दरवाढ करत आहे,खाद्य तेलाचे भाव तर गगनाला भिडले आहेत.
महागाई मुळे देशातील सामान्य जनता,शेतकरी व मोलमजुरी करणाऱ्या लोकांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची झाली आहे.त्यामुळे त्यांना जीवन जगणे कठीण झाले आहे
आधीच कोरोना मुळे लोकांचे रोजगार गेले आहेत ,त्यात दिवसेंनदिवस पेट्रोल,डीझेल, गॅस व खाद्य तेलाच्या दरवाढी मुळे केंद्र सरकारच्या विरोधात असंतोषाचे वातावरण आहे,सदर दर वाढीचे निषेधार्थ महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्षा सौ.सरीताताई मदनकर यांचे नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला ,त्या वेळी त्यांचे सोबत सरोज भुरे,मंजुषा बुरडे,ऍड.नेहा शेंडे,अश्विनी बुरडे ,धनवंता बोरकर,पुण्यशीला कांबळे,वर्षा आंबाडारे ,डॉ.पूर्णिमा वाहने,मीना गाढवे,प्रेरणा तुरकर,पमा ठाकूर,नंदा डोरले, ज्योती टेम्भुरने, कीर्ती गणवीर, सविता सारवे,आरती राऊत,ललिता घोडीचोर,अनिता भोंगाडे,नीता टेम्भुरनिकर,रेखा राखडे, सविता चवधरी ,मनोरमा गोस्वामीं,ललिता घोडीचोर, लता मेश्राम,शेवंता कहा लकर ,वृंदा गायधने,प्रीती रामटेके, फार मोठया संख्येनी महिला कार्यकर्ता उपस्थित होत्या.