BREAKING NEWS:
महाराष्ट्र हेडलाइन

ब्राम्हणवादी मानसिकतेचे देशाला पोखरून टाकले..? कोरोनाही एक षडयंत्र?

Summary

मुंबई विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. २ मे २०२१ देशाला पोखरुन काढलेल्या ब्राम्हणवादी व्यवस्थेचे दुष्परिणाम भारतातील आजच्या पिढ्यांना सहन करावे लागत आहेत. कोरोनाने, वैद्यकीय सोयी अभावी आज देशात जे हजारो निष्पाप लोकांचे जीव जात आहेत ते ह्या ब्राम्हणवादी मानसिकतेमुळे, विचारांमुळे. […]

मुंबई विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. २ मे २०२१
देशाला पोखरुन काढलेल्या ब्राम्हणवादी व्यवस्थेचे दुष्परिणाम भारतातील आजच्या पिढ्यांना सहन करावे लागत आहेत. कोरोनाने, वैद्यकीय सोयी अभावी आज देशात जे हजारो निष्पाप लोकांचे जीव जात आहेत ते ह्या ब्राम्हणवादी मानसिकतेमुळे, विचारांमुळे. आजही देशात अब्जोवधी संपत्ती देशातील मंदिरांमध्ये साठवुन ठेवली आहे. त्यापैकी 20 % संपत्ती बाहेर काढुन लोकोपयोगी कार्यासाठी खर्च केली तर आज प्रत्येक तालुक्यात एक अत्याधुनिक हॉस्पीटल ऊभे राहु शकते. हजारो आँक्सीजनचे प्लांटस निर्माण केले जावु शकतात, लाखो आयसीयु बेड व व्हेटींलेटर्स खरेदी केले जावु शकतात. पण देशातील लाखो लोक मेले तरी ह्या मंदीरातील संपत्तीचा एक रुपया कधी जनतेच्या कामात येणार नाही.? मंदीरामध्ये बसलेले पुजारी व मंदीराच्या ट्रस्टी नी एक वर्षापासुन थैमान घातलेल्या कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी जनतेची मदत केल्याचे ऐकीवात नाही. आज देशबांधवांना वाचवायचे असेल तर ह्या मंदीरात दडवुन ठेवलेल्या संपत्तीच्या पेट्यांची कुलुपे तोडणे आवश्यक आहे. दुसरे म्हणजे, ह्या विशालकाय देशामध्ये, फक्त 10.23 लाख अँलोपँथिक डॉक्टर्स (MBBS) रजिस्टर्ड आहेत. त्यापैकी 80% डॉक्टर्स सेवा देण्यासाठी ऊपलब्ध आहेत असे गृहित धरले तर फक्त 8.18 लाख डॉक्टर्स हे सेवा देत आहेत. आज देशाची लोकसंख्या 133 कोटी आहे, ह्यावरुन 1000 भारतीय लोकांमागे फक्त 0.62 एवढे डॉक्टर्स ऊपलब्ध आहेत. इतर देशामध्ये डॉक्टर्स: लोकसंख्येचे प्रमाण खालीलप्रमाणे आहे.
Australia – 3.374:1000,
Brazil – 1.852:1000,
China – 1.49:1000,
France – 3.227:1000,
Germany – 4.125:1000,
Russia – 3.306:1000,
USA – 2.554:1000,
Afghanistan – 0.304:1000,
Bangladesh – 0.389:1000,
Pakistan – 0.806:1000
ह्याचा अर्थ भारतात एक हजार लोकांमागे फक्त 0.62 डॉक्टर्स आहेत, ही संख्या पाकीस्तानपेक्षा सुद्धा कमी आहे. युद्धात बेचिराख झालेला अफगाणीस्तान आणि गरीब बांग्लादेश ह्यांची परिस्थिती भारतापेक्षा वाईट आहे. आता तुम्ही म्हणणार ह्यासाठी ब्राम्हणवाद कसा जबाबदार आहे ? ह्यासाठी ब्राम्हणवादच जबाबदार आहे कारण ह्याच ब्राम्हणवादी व्यवस्थेने, ब्राम्हणवादी मानसिकतेने देशात मोजकेच सरकारी वैद्यकिय कॉलेजेस सुरु केले. खाजगी मेडीकल कॉलेजेसची फी ही सामान्य लोकांच्या आवाक्याबाहेरची ठेवली. वैद्यकीय कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी जी Entrance Exam घेतली जाते त्या परीक्षेची तयारी करण्यासाठी लाखो रुपये खर्च येतो. सामान्य लोकांना हा खर्च झेपावत नाही त्यामुळे वैद्यकीय शिक्षण हे बहुसंख्य लोकांच्या आवाक्याबाहेर झाले आहे. ह्या सर्व कारणांमुळे देशामध्ये डॉक्टरांची कमी आहे.
देशामध्ये आजही जिकडे तिकडे मंदीर बांधले जाताहेत, बुवा-बाबांचा सुळसुळाट आहे, देवाचा, धर्माचा व्यापार मोठ्या प्रमाणात सुरु आहे. ह्या देवाच्या, धर्माच्या व्यापारात जी ऊलाढाल होते त्यापैकी थोडे पैसे जर दवाखाने उघडण्यासाठी खर्च केले गेले असते तर आज जे दिवस आपल्याला पहायला मिळताहेत, ते दिवस दिसले नसते. या व्यतिरिक्त देशात आज जी सामाजिक व आर्थिक विषमता आहे, देशाची सर्व सत्ता व संपत्ती बोटावर मोजता येतील इतक्या लोकांच्या घशात गेली आहे .व दुसर्या बाजुला 80 कोटी भारतीय हे दारीद्र्यामध्ये खितपत पडले आहेत, कोट्यावधी बेरोजगार युवकांची फौज देशामध्ये तयार झाली आहे. ह्या सगळ्यासाठी केवळ आणि केवळ ब्राम्हणवादी व्यवस्थेचा सैतान जबाबदार आहे. कोरोना आज आहे, उद्या नष्ट होईल. त्याच्यावर लसी निघत आहेत. पण ब्राम्हणवादी व्यवस्थेच्या सैतानाचे काय ? त्याच्यावर लस केव्हा निर्माण होणार ?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *