BREAKING NEWS:
महाराष्ट्र हेडलाइन

*बोरी (सिंगोरी) येथे भरदिवसा ६ तोळे सोन्याचे दागिने व नगदी १ लाख रूपयांची चोरी.*

Summary

*नागपूर* कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत बोरी (सिंगोरी) येथे भरदिवसा विनायक येरणे यांच्या घरी कुणी नसल्याचे पाहुन अज्ञात चोरानी आलमारीतील ६ तोळे सोन्याचे दागिने व नगदी १ लाख रूपये अशा एकुण अदाजे चार लाखाची चोरी करून पसार झाले. कन्हान […]

*नागपूर* कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत बोरी (सिंगोरी) येथे भरदिवसा विनायक येरणे यांच्या घरी कुणी नसल्याचे पाहुन अज्ञात चोरानी आलमारीतील ६ तोळे सोन्याचे दागिने व नगदी १ लाख रूपये अशा एकुण अदाजे चार लाखाची चोरी करून पसार झाले.
कन्हान पासुन पुर्वेस ८ कि मी लांब तारसा रोड वरील बोरी (सिंगोरी) येथील विनायक येरणे यांचा मुलाचे यावर्षी लग्न करित असल्याने मुलगा सागर व सुनेकरिता दागदागिने बनवुन पैशाची जुळवाजुळव करित असतांनाच शनिवार (दि.२७) ला दुपारी २ ते ४. ३० वाजाता दरम्यान गावातील विनायक मागोजी येरणे वय ५५ वर्ष हे व घरची मंडळी गावातच कामा निमित्य गेले असल्याने त्याच्या घरी कुणीही नसल्या ची संधी साधुन अज्ञात चोरानी घरात प्रवेश करून घराच्या सामोरील हॉल मधिल आलमारीत ठेवलेले १५ ग्रँम सोन्याचा गोफ, ६ ग्रँम अंगठी, ३ ग्रँम टॉप, ३ ग्रँम वेल, ३ ग्रँम नथ, ३ ग्रँम अंगठी, ५ ग्रँम गळसोळी, ३ तोळे चपलाकंठी, नगदी ३२ हजार रू. तसेच मधल्या खोलीतील लोखंडी आलमारीतुन ५ ग्रँम सोन्याची अंगठी व नगदी ४० व २० हजार रूपये असे अंदाजे चार लाख रूपयाचे नगदी व सोन्याच्या दागिन्याची चोरी करून अज्ञात चोर पसार झाले. घरचे ५ वाजता घरी आल्यावर आलमारील नगदी रूपये व सोन्याचे दागिने दिसुन न आल्याने फिर्यादी विनायक येरणे यांच्या तक्रारीवरून कन्हान पोलीसानी घटनास्थळी तपास करून अज्ञात चोरा विरूध्द कलम ३८० भादंवि नुसार गुन्हा नोंद करून कन्हान थानेदार अरूण त्रिपाठी यांच्या मार्गदर्शनात पोउपनि पोउपनि जावेद शेख, पोउपनि महादेव सुरजुसे पुढील तपास करित आरोपीचा शोध घेत आहेत.
संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
नागपूर विभागीय अध्यक्ष
Dr पं दे राष्ट्रीय शिक्षक परिषद
9158239147

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *