प्राथमिक शिक्षण विभागातील हलगर्जी पणामुळे शिक्षकांचे वेतन उशिरा

चंद्रपूर :- प्राथमिक शिक्षकांच्या वेतनासाठी कमी पडणारी रक्कम शासनाकडून 25 सबटेम्बर 2020 ला सकाळी 11 =00वाजता 9 कोटी रुपये चंद्रपूर जिल्हा परिषद ला प्राप्त होऊन माहे ऑगस्ट 2020 चे वेतन देयक वित्त विभागात सादर झाले नाही अशी तक्रार प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष जयदास सांगोडे यांनी मुख्यकार्यकारी अधिकारी, मुख्यलेखा तथा वित्त अधिकारी, जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्याकडे मेल वर केली आहे. प्राथमिक शिक्षण विभागाचे आस्थापना लिपिक यांच्या हलगर्जी पणामुळे वेतन 5 दिवसाने उशिरा होणार आहेत.माहे ऑगस्ट 2020 च्या वेतनासाठी 9 कोटी रुपये कमी पडत होते. शासनाकडून ती रक्कम दि. 25/9/2020 रोजी सकाळी 11=00 वाजता रक्कम शासनाकडून प्राप्त झाली आहे. असे असतांना प्राथमिक शिक्षण विभागातून देयक आजतागायत लेखा विभागात सादर झालेले नाही. लेखा विभागाला शिक्षण विभागातून देयक सादर करण्यासाठी 5 दिवस लागतात. त्यानंतर ते देयक मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, चंद्रपूर यांच्या स्वाक्षरीसाठी जाणार असून त्यानंतर 3 आक्टोबर ला देयक जिल्हा कोषागारात जाणार, तेथे 7 दिवस लागतील, पुन्हा कोषागारातून सि एम टी आल्यावर तीन दिवस लागतात. त्यानंतर पंचायत समिती ला आर टी जी एस केला जातो.यावरून माहे ऑगस्ट 2020 चे वेतन 14 आक्टोबर 2020 नंतरच होणार. चंद्रपूर जिल्हा परिषद चा शिक्षण विभाग नेहमीच शिक्षकांचे वेतन देयक शासनाचा वेतनाचा निधी प्राप्त होऊन सुद्धा उशिराने वेतन देयक सादर करीत आहे. प्राथमिक शिक्षण विभागाचा हलगर्जी पणा दिसून येत आहे. विभागाच्या नेहमीच्या हलगर्जीपणामुळे प्राथमिक शिक्षकांचे वेतन नेहमीच उशिराने होत आहेत. प्रहार शिक्षक संघटना ही वेतन उशिराने होत असल्याबाबत शासनाकडे वारंवार तक्रारी करीत आहे. परंतु शासन स्तरावरून निर्देश प्राप्त होऊन सुद्धा वेतन वेळेवर होत नाही. त्यामुळे लवकरच प्रहार शिक्षक संघटना चंद्रपूर जिल्हा परिषद च्या भोंगळ कारभाराविषयी आंदोलन करणार असून लवकरच आंदोलनाची नोटीस प्रशासनाला देणार आहे असे प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हा सरचिटणीस विनोद लांडगे यांनी एका पत्रका दारे कळविले आहे