प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान ला स्थानिक नागरिकां ना लसीकरणास प्राधान्य द्या. भाजपा पारशिवनी तालुका अध्यक्ष अतुल हजारे व्दारे ई.मेल द्वारे मा. मुख्यमंत्र्यांना निवेदन.
*नागपूर* कन्हान : – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे शासना द्वारे प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंन्द्रावर १८ ते ४४ वयोगटातील युवक युवतीचे लसीकरण मोहिम सुरु केले आहे. परंतु ऑनलाईन नोंदणी पद्धत सुरू केल्याने बाहेरील लोक लसीकरण करून घेत आहे आणि स्थानिक नागरिक लसीकरणा पासुन वंचीत राहत असल्यामुळे भाजपा पारशिवनी तालुका अध्यक्ष अतुल हजारे यांनी ई.मेल.आईडी. द्वारे राज्याचे मुख्य मंत्री मा.श्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पत्र पाठवुन प्राथमिक आरोग्य केंन्द्रावर स्थानिक नागरिकांचे प्राधान्याने लसीकरण करण्याची मागणी केली आहे .
देशात, राज्यात, जिल्ह्यात, तालुक्यात व कन्हान शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे शासना द्वारे राज्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंन्द्रावर १८ ते ४४ वयोगटातील युवक युवतीचे लसीकरण मोहिम सुरु केले आहे. परंतु लसीकरण ऑनलाईन नोंदणी पद्धत सुरु केल्याने बाहेरच्या तालुक्यातील व शहरातील लोक लसीकरण करून घेत असल्यामुळे स्थानिक नागरिक लसीकरणा पासुन वंचीत राहत आहे. पारशि वनी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंन्द्रावर चंन्द्रपुर, भंडारा, गोंदिया आणि लगतच्या नागपुर शहर, ग्रामीण येथील लोकांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केल्यामुळे व रोज लसीकरण सुरू झाल्यानंतर बाहेरून येणा-या नागरिकांचे लसीकरण केले जाते. त्यामुळे पारशिवनी तालुक्यातील नागरिक लसीकरणा पासुन वंचित राहत असल्यामुळे नागरिकांन मध्ये तीव्र असंतोष निर्माण होत आहे. या रोषाचे आणखी दुसरे मुख्य कारण ऑन लाईन रजिस्ट्रेशन केल्यानंतर तेव्हाच सेडुल बुकींग चा पर्याय येत नसुन तो कोणत्या ही वेळी त्याचा स्लाॅट ओपन होतो. ग्रामीण च्या नागरिकांना याबद्दल जागरू कता नसुन ते दिवसेदिवस स्लाॅट बुकींग ची वाट बघत असतात. हीच परिस्थिती जिल्ह्यातील सर्व ग्रामीण प्राथमिक आरोग्य केंन्द्रावर असल्याने भाजपा पारशि वनी तालुका अध्यक्ष अतुल हजारे यांनी जिल्हाधिकारी रविंन्द्र ठाकरे यांना प्राथमिक आरोग्य केंन्द्रावर स्थानि क नागरिकांना लसीकरणासाठी प्राधान्य देऊन नागरि कांना होणारा संघर्ष टाळण्यात यावा. अशी मागणी निवेदनाने करून राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री उद्धव ठाकरे साहेबांना ई मेल आयडी वर निवेदन पत्र पाठवुन केली आहे.
भाजपा पारशिवनी तालुका अध्यक्ष अतुल हजारे यांनी राज्याचे मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांना पाठवि लेला ई.मेल मुख्यमंत्री कार्यालयास प्राप्त झाला असुन तो पुढील कार्यवाहीस नगरविकास २ तसेच सा. आरोग्य विभागास पाठविण्यात आला आहे.
✍🏼संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
9579998535