पोहरा आरोग्य उपकेंद्र चमूच्या प्रयत्नांनी कमी वजनाच्या बालिकेच्या आरोग्यात सुधारणा
अमरावती, दि. 25 : अवघे 1 किलो 900 ग्रॅम वजन, त्यात लघवीच्या ठिकाणी दुखरा अल्सर, ताप अशा अवस्थेतील बालिकेवर योग्य उपचार, पालकांचे समुपदेशन, पाठपुरावा यामुळे पोहरा आरोग्य उपकेंद्रातील कर्मचा-यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. या बालिकेच्या आरोग्यात सुधारणा झाली असून, तिचे वजन सुमारे अडीच किलो झाले व ती सुखरूप आहे. इतकेच होते. त्यामुळे बाळाला दवाखान्यात इन्क्युबेटर मध्ये ठेवले परंतु माता व मातेचे नातेवाईक तिथे बाळाला ठेवण्यास तयार नव्हते व शेवटी त्यांनी स्वतःच्या जबाबदारीवर घरी
अंजनगांव बारी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत पोहरा उपकेंद्रातील राजुरा येथील पारधी बेडा याठिकाणी वृषाली पवार या मातेस प्रसूतीसाठी संदर्भित करण्यात आले. पोह-याचे डॉ. मंगेश पाटील यांनी बेड्यावर जाऊन नियमित गृहभेटी करुन संस्थात्मक प्रसुतीसाठी या कुटुंबाचे समुपदेशन केले. त्यामुळे ही माता शासकीय रुग्णालयात दाखल झाली. मातेने बालिकेला जन्म दिला. मात्र, बाळाचे वजन फक्त 1 किलो 900 ग्रॅम इतकेच होते. त्यामुळे बाळाला इन्क्युबेटरमध्ये ठेवण्यात आले. माता व मातेचे नातेवाईक बाळाला तिथे ठेवण्यास तयार नव्हते व शेवटी त्यांनी स्वतःच्या जबाबदारीवर घरी जाण्याची परवानगी मागितली.
त्यांनी जरी सुट्टी घेतली तरीही त्या बाळाचे प्राण वाचविणे ही जबाबदारी ओळखून डॉ. पाटील यांनी या कुटुंबाच्या घरी जाऊन समुपदेशन केले. बालकांचे संगोपन, दुध पाजण्याची पध्दती, आवश्यक स्वच्छता व काळजी याबाबत कुटुंबियांना माहिती दिली. बाळाला सुती कापडामध्ये कसे गुंडाळावे, याबाबतही मार्गदर्शन केले.
दरम्यान, चौथ्या दिवशी बाळाची तपासणी करताना लघवीच्या ठिकाणी दुखरा अल्सर झाल्याचे आढळून आले. त्यामुळे बाळाला ताप येणे साहजिक होते. त्यावर तत्काळ उपचार करण्यात आला. नवव्या दिवशी बाळाच्या तोंडात फोड आल्याचे डॉक्टरांच्या निर्दशनास आले. त्यावरही तत्काळ उपचार केल्याने बाळ बरे झाले. योग्य समुपदेशन व काळजीमुळे त्याच्या वजनात वाढ होऊन आजघडीला बाळाचे वजन 2 किलो 400 ग्रॅम एवढे झाले आहे.
बेड्यावर संस्थात्मक प्रसुतीचे प्रमाण वाढण्यासाठी सातत्याने जनजागृती होत असल्याची माहिती आरोग्यसेविका विजया बारसे यांनी दिली.