पोलिस योद्धा न्यूज चॅनेल चे मुख्य संपादक मा. श्री. राजकुमार खोब्रागडे यांचा वाढदिवस चंद्रपूर शहरात साजरा
चंद्रपूर:- काल दिनांक 07 जुलै 2024 रोजी पोलिस योद्धा चे मुख्य संपादक तथा डायरेक्टर मा. श्री. राजकुमार खोब्रागडे यांचा वाढदिवस मैत्र बुद्ध विहार, राजिव गांधी वॉर्ड, बंगाली कॅम्प येथे मैत्र बुद्ध विहार चे सभासद यांनी साजरा केला. मैत्र बुद्ध विहार, राजिव गांधी वॉर्ड, बंगाली कॅम्प चे अध्यक्ष मनोज गणवीर, उपाध्यक्ष दिलीप सोरदे, सचिव संतोष नवसागरे, सदस्य दिनेश वाघमारे, सदस्य महेंद्र गोंडाणे, सदस्य बंडूभाऊ देशकर, सदस्य कमलेश रामटेके यांनी पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क चे मुख्य संपादक तथा डायरेक्टर राजकुमार खोब्रागडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. मैत्र बुद्ध विहार च्या वरील सभासदांना राजकुमार खोब्रागडे यांनी वाढदिवसानिमित्त भारताचे संविधान पुस्तक भेट म्हणून देऊन त्यांचा सन्मान केला.
पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क चे न्यूज एडिटर अमर वासनिक यांनी सुद्धा राजकुमार खोब्रागडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
अशारीतीने आगळ्या वेगळ्या रीतीने डायरेक्टर श्री. राजकुमार खोब्रागडे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.