देश महाराष्ट्र हेडलाइन

पेट्रोल डिझेल भाव वाढीच्या विरोधात पनवेल राष्ट्रवादी युवकचे निषेध आंदोलन

Summary

मुंबई: दि ११ जानेवारी रोजी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष प्रमोद बागल कार्याध्यक्ष शहबाझ पटेल यांच्या नेतृत्वाखाली खारघर येथे निषेध आंदोलन घेण्यात आले.कोरोना संकटकाळात पेट्रोल-डिझेलच्या किंमती सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे सामान्य माणसाच्या खिशावरील भार […]

मुंबई: दि ११ जानेवारी रोजी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष प्रमोद बागल कार्याध्यक्ष शहबाझ पटेल यांच्या नेतृत्वाखाली खारघर येथे निषेध आंदोलन घेण्यात आले.कोरोना संकटकाळात पेट्रोल-डिझेलच्या किंमती सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे सामान्य माणसाच्या खिशावरील भार देखील वाढू लागला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात होणारी वाढ अजूनही थांबलेली नाही.मुंबईसह राज्यातील अन्य भागांसह
देशातही पेट्रोलचे भाव नव्वदी तर डिझेलचे दर ऐंशी पार गेले आहेत. अर्थात ही बातमी सामान्य लोकांना सुखावणारी नाही.
सरकार फक्त मोठ-मोठ्या घोषणा करत आहे. प्रत्यक्षात नागरिकांना त्याचा कोणताही लाभ होत नाही.  गेले अनेक महिने लॉकडाऊनचे होते, सामान्यांसाठी जगणं मुश्किल झालेला काळ. मात्र आता मोदी सरकारनं पेट्रोल डिझेलवरचा अबकारी कर अनेकदा वाढवलेला आहे. खरंतर डिझेल हे शेतकरी, वाहतूकदारांसाठी महत्त्वाचं इंधन. डिझेलमधली वाढ ही लगेच महागाई वाढायला कारणीभूत ठरते, सार्वजनिक वाहतुकीचं गणित असो की शेतमालाच्या वाहतुकीची साखळी या सगळ्यांना डिझेलमधली वाढ प्रभावित करते. त्यामुळेच ती सामान्यांवर अधिक घात करते. इंधन दरवाढीमुळे इतर वस्तूंच्या किमतीवर परिणाम होतो. त्याचा फटका सामान्य व्यक्तीला बसतो. केंद्र सरकारने इंधन दरवाढ कमी करावी ह्या साठी आज पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून आंदोलन घेण्यात आले. यावेळी अल्पसंख्याक सेल राष्ट्रीय उपाध्यक्ष फारुकभाई पटेल,राष्ट्रवादी युवकचे जिल्हा उपाध्यक्ष राकेश थोरात,तुषार मानकर,खारघर शहर अध्यक्ष बळिमामा नेटके,ओबीसी सेल जिल्हा अध्यक्ष विजयजी मयेकर,खारघर शहर ओबीसी सेल अध्यक्ष नरेश दादा पाटील,कल्पेश मयेकर,ओंकार भोसले,तुकाराम भगत,गणेश शितोळे,महिला अध्यक्षा राजश्रीताई कदम,युवती जिल्हाध्यक्षा प्रज्ञाताई चव्हाण,नेहा ताई पाटील,हारून लोहार,चांद शेख,विजय भोसले,फरहान गोलंदाज,प्रणय परब व बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.अशी माहिती पनवेल शहर जिल्हा सरचिटणीस रणजित नरुटे यांनी दिली.

सचिन सावंत शेलेवाडी
(मंगळवेढा) सोलापूर
9370342750
पोलिस योद्धा न्युज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *