महाराष्ट्र रोजगार सोलापुर हेडलाइन

पुणे विभागस्तरीय नमो महारोजगार मेळाव्याचे दि. २ व ३ मार्च रोजी बारामती येथे आयोजन विविध आस्थापनांनी रिक्त पदांची माहिती , बेरोजगार युवक आणि युवतींनी नोंदणी करण्याचे आवाहन

Summary

सोलापुर, दि. 29 :(जिमाका) :- कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत बेरोजगार युवक व युवतींसाठी दि. 2 व 3 मार्च रोजी विद्या प्रतिष्ठानचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, विद्यानगरी, बारामती येथे नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. ज्या उद्योजक आस्थापनांना […]

सोलापुर, दि. 29 :(जिमाका) :- कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत बेरोजगार युवक व युवतींसाठी दि. 2 व 3 मार्च रोजी विद्या प्रतिष्ठानचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, विद्यानगरी, बारामती येथे नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. ज्या उद्योजक आस्थापनांना मनुष्यबळाची आवश्यकता आहे तसेच  नोकरी इच्छुक युवक व युवतींनी नोंदणी करण्याचे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मार्गदर्शन केंद्राचे प्र. सहायक आयुक्त हणमंत नलावडे यांनी केले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांमार्फत नोकरी इच्छुक युवक व युवती, तसेच नवउद्योजकांच्या कल्पनांना चालना देण्यासाठी पुणे विभागातंर्गत पुणे, सोलापुर, सातारा, सांगली, कोल्हापुर जिल्ह्यातील नोकरीइच्छुक युवक व युवतींसाठी नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या मेळाव्यात 200 पेक्षा जास्त नामाकिंत उद्योजकांनी सहभाग दर्शविलेला आहे. सदर मेळाव्यात त्यांच्याकडून 20 हजार पेक्षा अधिक रिक्तपदे अधिसूचित करण्यात आली आहेत. ही सर्व रिक्त पदे 10 वी, 12 वी, ड्राव्हर, पदवीधर, एमएस्सी, बी.कॉम, डिमई, बीबीए, एमबीए, एम. फार्म, कोणत्याही शाखेचा आटीआय, डिप्लोमा, ट्रेनी इंजिनिअर अशा विविध पात्रताधारक उमेदवारांसाठी असून पुणे विभागातील जास्तीत जास्त नोकरी इच्छूक उमेदवारांना या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून नोकरीच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. नोकरी इच्छुक युवक-युवती यांनी मुलाखतीसाठी आणि महाएक्सपो मध्ये स्टार्टअप्स, इनोव्हेटर्स, इनकुबेटर्स यांनी देखील या मेळाव्यामध्ये सहभागी व्हावे.

नोकरीइच्छुकांनी  https://rojgar.mahaswayam.gov.in/#/register या संकेतस्थळाला भेट देऊन नांव नोंदणी व नोकरीकरिता अर्ज करून प्रत्यक्ष मुलाखतीसाठी उपस्थित राहू शकतात. एकापेक्षा अधिक नोकरीसाठी देखील उमेदवाराला अर्ज करता येईल, प्रत्यक्ष मुलाखती देता येतील. रोजगार मेळाव्यात सहभागी होणा-या उमेदवारांनी मेळाव्याच्या अगोदर पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. व ज्या उमेदवारांच https://rojgar.mahaswayam.gov.in या वेब पोर्टलवर नोंदणी नसेल अशा उमेदवारांची नमो महारोजगार मेळावाच्या ठिकाणी प्रत्यक्ष नोंदणी करून अशा उमेदवारांचे देखील मेळाव्याच्या दिवशी मुलाखतीस उपस्थित राहून मुलाखत देवू शकतील. या माध्यमातून दोन लाख युवक आणि युवतींना रोजगार देण्याचा राज्य व विभागीय प्रशासनाचा मानस आहे.

नमो महारोजगार मेळाव्याकरिता जास्तीत जास्त संधी उपलब्ध होण्याकरिता कौशल्य विकास विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, जिल्हा लघुउद्योग केंद्र सोलापुर तसेच उद्योग व कामगार विभाग सोलापुर यांना विविध कंपन्याशी संपर्क साधून रिक्त पदे अधिसूचित करण्याबाबत जिल्हाधिकारी श्री. कुमार आर्शिवाद यांनी निर्देश दिले आहेत.

तसेच उद्योजक आस्थापनांनी https://rojgar.mahaswayam.gov.in/#/employer_registration या वेब पोर्टलवर उद्योजक नोंदणी करून रिक्त पदे अधिसूचित करणे आवश्यक आहे. याबाबत काही अडचण असल्यास संबंधित जिल्ह्यातील नोडल अधिकारी यांच्याशी किंवा 0217-2956956 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, तसेच उमेदवारांनी या नमो महारोजगार मेळाव्यास मुलाखतीस येताना सोबत आपली सर्व शैक्षणिक कागदपत्रे, पासपोर्ट आकाराची छायाचित्रे, आवश्यकतेनुसार अर्ज व आधारकार्डाच्या छायाकिंत प्रती सोबत आणाव्यात. जिल्हायातील अधिकाधिक उमेदवारांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेण्याचे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मार्गदर्शन केंद्राचे प्र. सहायक आयुक्त नलावडे यांनी केले आहे.

000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *