पिळवणूक करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करावी.:- अन्यायग्रस्त मजुरांची मागणी.

गडचिरोली विभागीय प्रतिनिधी. चक्रधर मेश्राम दि २१ एप्रिल २०२१ :- आरमोरी नगरपरिषद अंतर्गत कंत्राटदारां माफऀत कंत्राटी पध्दतीने काम करणारे कामगार मागील चार वर्षे पासून शहरातील साफसफाई, घनकचरा व्यवस्थापन, सार्वजनिक स्वच्छता, परिसर स्वच्छता , शासकीय साफसफाई निरंतरपणे करून सामाजिक आरोग्य आणि व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. परंतु दिपक उत्तराधिकारी आणि स्थानिक पातळीवर काम पाहात असलेल्या सप्टेंबर या कंत्राटदारांनी अहोरात्र काम करणाऱ्या मजुरांना वेठीस धरुन ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. आतापर्यंत त्या मजुरांना किमान वेतन न देता काम करून घेतले आहे. त्यामुळे मजुरांना आर्थिक शोषणाचे बळी पडावे लागले आहे. नियमानुसार तसेच नगरपरिषदेच्या सेवा , शर्ति आणि अटी नुसार कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन बॅंकेतील त्यांचे खात्यात जमा करून देणे आवश्यक आहे. परंतु कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन दिले जात नाही. आपल्या अनेक न्याय मागण्यासाठी कामगारांनी भर उन्हात कामबंद आंदोलन सुरू केले होते. परंतु स्थानिक पातळीवर नगर प्रशासन कंत्राटदाराच्या पाठीशी उभे असल्याने कामगाराच्या समस्या सोडविण्यासाठी न. प. प्रशासन अपयशी ठरले आहे. कोरोना च्या काळात या कामगारांनी जिवाची पर्वा न करता कोरोनाने मृत्यू झालेल्या लोकांच्या अंत्ययात्रेसाठी प्रत्यक्ष सहभाग घेतला होता. नाल्यासफाईचे काम करुन हिवताप, हत्तीरोग, जलजन्य आजार आणि किटकजन्य आजार नियंत्रण ठेवण्यासाठी काम करीत आहेत.. कत्राटदाराने केलेल्या अन्याय आणि शोषणाचे विरोधात न्याय मिळावा यासाठी कामगारांनी पोलीस निरीक्षक आरमोरी यांच्या कडे निवेदन सादर केले आहे. तरीही त्यांना पोलीस प्रशासन आणि नगर परिषद प्रशासन न्याय मिळवून देणार का❓ स्थानिक जन प्रतिनिधी या असलेल्या कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी लक्ष वेधणारी ❓ यासारखे अनेक प्रश्न या निमित्ताने निर्माण झाले आहेत. याप्रसंगी कामगारांचे मुलभूत अधिकार आणि हक्काचे शोषण होत आहे असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही.