हेडलाइन

पालक मंत्री यांना प्रहार शिक्षक संघटनेचे निवेदन

Summary

चंद्रपूर :- जिल्हा परिषद मध्ये शिक्षकांचे विविध प्रश्न प्रलंबित असल्यामुळे प्रहार शिक्षक संघटना जिल्हाध्यक्ष जयदास सांगोडे यांनी जिल्हा परिषद प्रशासनाला आंदोलन पूर्व नोटीस दिली असून प्रशासनाने अजूनही शिक्षकांच्या समस्या निकाली काढल्यात नाही .याकरता चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार विजय वडेट्टीवार यांना […]


चंद्रपूर :-
जिल्हा परिषद मध्ये शिक्षकांचे विविध प्रश्न प्रलंबित असल्यामुळे प्रहार शिक्षक संघटना जिल्हाध्यक्ष जयदास सांगोडे यांनी जिल्हा परिषद प्रशासनाला आंदोलन पूर्व नोटीस दिली असून प्रशासनाने अजूनही शिक्षकांच्या समस्या निकाली काढल्यात नाही .याकरता चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार विजय वडेट्टीवार यांना प्रहार शिक्षक संघटनेचे शिष्टमंडळ गडचिरोली येथे भेट घेऊन निवेदनातील समस्या तात्काळ सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासनाला निर्देश द्यावे अशी विनंती प्रहार शिक्षक संघटनेच्या शिष्टमंडळाने केली आहे.
चंद्रपूर जिल्हा परिषदेमध्ये प्राथमिक शिक्षकांच्या समस्या मोठ्या प्रमाणात प्रलंबित असून वारंवार प्रशासनाला नोटीस देऊन सुद्धा प्रशासन कोणतीही कारवाई करीत नाही. भविष्य निर्वाह निधी खात्यातून स्वतःची रक्कम मागण्यासाठी अर्ज केला असता, भविष्य निर्वाह निधी खात्यातून रक्कम मिळण्या स आठ ते नऊ महिने लागतात, वैद्यकीय परिपूर्ती देयक मागील तीन वर्षापासून प्रलंबित आहेत, सेवानिवृत्त शिक्षकांना मासिक पेन्शन, गटविमा, उपदान दानाची रक्कम, भविष्य निर्वाह निधीतून अंतिम रक्कम एक ते दोन वर्षे मिळत नाही, प्राथमिक शिक्षक, केंद्रप्रमुख, उच्चश्रेणी मुख्याध्यापक, विस्तार अधिकारी, जिल्हा परिषद हायस्कूल मधील शिक्षक यांना वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी मागील तीन वर्षापासून मिळालेले नाही., मागील आठ महिन्यापासून मासिक वेतन हे कधीही वेळेवर मिळाली नसून मासिक वेतनाची रक्कम शासनाकडून प्राप्त होऊनही जिल्हा परिषद कडून दिरंगाई केली जात आहे, विषय शिक्षक यांना वेतनश्रेणी दिली जात नाही, शिक्षकांच्या अजूनही सहाव्या वेतन आयोगाच्या थकबाकी रक्कम, भविष्य निर्वाह निधी खात्यात अजूनही जमा झाली नाही,आदिवासी भागात काम करणाऱ्या शिक्षकांना एकस्तर वेतन श्रेणी देण्यात यावी, 2005 नंतर सेवेत लागणाऱ्या शिक्षक यांच्या पूर्वीचा कपातीचा हिशोब मिळाल्यावर एनपीएस योजना लागू करावी असा एकूण 49 समस्याची निवेदन पालकमंत्री नामदार विजय भाऊ वडेट्टीवार यांना देण्यात आलेली असून निवेदनावर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी संघटनेच्यावतीने करण्यात आली असून चंद्रपूर जिल्हा परिषद हे समस्या चे माहेरघर बनत चालल्यामुळे प्रहार शिक्षक संघटनेला आंदोलन केल्या शिवाय पर्याय उरला नाही असे भेटी दरम्यान पालकमंत्री यांना सांगण्यात आले आहे.
शिष्टमंडळात देवेंद्र रायपुरे जिल्हा कोषाध्यक्ष, मिलिंद खोब्रागडे तालुकाध्यक्ष, योगेश रामटेके तालुका सरचिटणीस,भारत रामटेके, ललित खोब्रागडे, निमगडे सर, सतीश बडोले, मिलिंद खंडाइत, हे निवेदन देताना उपस्थित होते.


देवेंद्र दयाळ रायपुरे,
जिल्हा कार्याध्यक्ष, प्रहार शिक्षक संघटना जिल्हा चंद्रपूर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *