*पाच राज्याच्या निवडणूकीनंतर देशात कोरोनाचा विस्फोट होणार!* *देशवासियांनो सावधान ; रात्र वैऱ्याची आहे!* कामगार नेते महेंद्र कुंभारे,
मुंबई प्रतिनिधी चक्रधर मेश्राम. दि. १८ एप्रिल २०२१
देशाच्या राजालाच देशातील जनतेच्या जिवाची चिंता नसेल तर, जनतेचे काही खरे नाही असे समजा. सध्या देशात कोरोनाने कहर केला असुन दररोज २ लाखाच्या वर कोरोना बाधितांची संख्या होऊ लागली आहे. *मृतांचा आकडाही हजाराच्या पटीत असुन बिकट परिस्थिती पाहुन मृत्यूचाही थरकाप उडाला आहे. मरणानंतर सरणासाठी लाकडेही कमी पडत आहेत. स्मशान आणि कब्रस्तानात मृतदेह जाळण्यासाठी आणि पुरण्यासाठी भल्यामोठ्या रांगा लागल्या आहेत. तिथे नातेवाइकांचा आक्रोश ऐकायला येत असुन भयाण शांतताही पसरली आहे. आता तर मृतदेह जाळण्यासाठी आणि पुरण्यासाठी जागाच शिल्लक नसल्यामुळे मरणानंतरही त्या देहाची विटंबना होणार हे निश्चित आहे.* म्हणून असे मरण नकोच याकरिता नागरिकांनी या भयानक कोरोनापासून बचावासाठी त्याची खिल्ली उडवायची सोडून सरकारी सूचनांचे आणि नियमांचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे. *कारण, येणारा २ मे नंतरचा काळ देशासाठी भयंकर असुन देशात कोरोनाचा विस्फोट होऊन मृतांचा खच पहायला मिळण्याची शक्यता आहे.* कारण, पाच राज्यात विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. निवडणुकीच्या प्रचाराला लाखोंच्या संख्येने लोकं येत आहेत. तिथे कोरोनासाठी गाईडलाईन नाही आहेत. संपूर्ण शासकीय यंत्रणा फक्त निवडणूकीच्या कामाला जुंपल्या आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणांवर नियंत्रण राहिले नाही. म्हणून तिथेही कोरोना रुग्णांच्या संख्येत हजारोंच्या पटीने वाढ होत आहे. *देशाचा राजा एक राज्य काबीज करण्यासाठी उतावीळ झाला आहे. दिवसा मास्क न लावता लाखोंच्या सभा घेत आहे, आणि रात्री जनतेने सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन मास्क लावण्याचे आवाहन राजा करत आहे.* देशात कोरोनाने हाहाःकार माजविला असताना देशाचा राजा निवडणूक जिंकण्यासाठी उतावीळ झाल्याचे पहायला मिळत आहे. *गेल्यावर्षी असेच प्रसिध्दीच्या हव्यासापोटी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प च्या स्वागतासाठी कोरोनाकडे दुर्लक्ष केले आणि त्याची देशाला मोठी किंमत मोजावी लागली. तो अनुभव पाठीशी असताना आणि आता पुन्हा कोरोनाची दुसरी लाट पसरत असताना पुन्हा राजाकडुन तिच चूक होताना दिसत आहे. फरक इतकाच आहे कि गेल्यावर्ची ट्रम्प आणि आता निवडणूक आहे इतकेच.*
या पाच राज्याच्या २ मे च्या मतमोजणी नंतर तिथे कोरोना बाधित रुग्णांची संख्या हजारोंच्या पटीने झपाट्याने वाढण्याचे संकेत आहेत. *शिवाय विविध राज्यातून निवडणूकीसाठी आलेले मतदार पुन्हा त्या त्या राज्यात कोरोना ला सोबत घेऊनच परतणार आहेत. त्यामुळे एकाचवेळी संपूर्ण देशात कोरोनाचा भयंकर विस्फोट होणार आहे. हि लाट इतकी भयंकर असणार आहे की, लाखांच्या संख्येने लोकं मरताना पहायला लागणार आहे.* शिवाय उत्तराखंड राज्यात कुंभमेळा भरला आहे. या कुंभमेळ्याला देशभरातून ४८ लाख लोकं आल्याचे सरकारी आकडेवारी सांगते. येत्या दोन दिवसात या कुंभमेळ्याचीही सांगता होणार आहे. तिथेही कोरोनाने कहर केला असुन आखाड्याचे महामंडलेश्वर कपिल देव महाराज यांचे नुकतेच कोरोनाने निधन झाले आहे. तिथेही १७०० रुग्णांचा कोरोना रिपोर्ट पाॅझिटिव्ह आलेला आहे. अजूनही तपासणी केलेल्या हजारो लोकांचा रिपोर्ट येणे बाकी आहे. *आणि कुंभमेळ्याच्या सांगता नंतर हेच ४८ लाख लोकं पुन्हा आपापल्या राज्यात म्हणजेच देशाच्या विविध भागात जाणार आहेत. आणि मग त्यांच्या सोबत कोरोना ही जाणार हे आलेच.* मग, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. पाच राज्याच्या निवडणुका आणि कुंभमेळ्यानंतर देशात कोरोनाचा विस्फोट का नाही होणार? म्हणून पुढील काळ देशासाठी अत्यंत महत्त्वाचा असुन माणसे मरण्याची सुनामी येण्याची दाट शक्यता आहे. म्हणून स्वतः आणि आपल्या परिवाराचे रक्षण करण्याची जबाबदारी तुमची स्वतःचीच आहे. कारण, राजाला तुमची फिकिर नसून तो निवडणुक जिंकण्यासाठी मग्न आहे. आणि ज्याला जनतेचे जीव वाचविण्यापेक्षा खुर्ची महत्त्वाची वाटते तो तुमचे काय रक्षण करणार ? म्हणून देशवासियांनो सावधान, रात्र वैऱ्याची आहे!