नोकरीचे आमिष दाखवून 7.50 लाखांनी घातला गंडा युवकांना सतर्क राहण्याचा इशारा कोणत्याही आमिषाला बळी पडू नका
नोकरीचे आमिष दाखवून 7.50 लाखांनी घातला गंडा युवकांना सतर्क राहण्याचा इशारा कोणत्याही आमिषाला बळी पडू नका
पोलीस योद्धा वृत्तसंस्था
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
हिंगणघाट , नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून व्यक्तीला तब्बल 7 लाख 50 हजार रुपये गंडविलयाची घटना हिंगणघाट येथील संत ज्ञानेश्वर वॉर्ड येथे घडली. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे . सतीश भोयर , अनिता देशमुख , रोशन पाटील यांनी प्रभोधन सुरेश भालेराव राहणार मिलिंद सोसायटी हिंगणघाट यांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्याकडून 7 लाख 50 हजार रुपये उकळले वारंवार नोकरी बाबत विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे दिल्याने
त्यांना आपली फसवणूक झाल्याचे कळतात प्रभोधन भालेराव यांनी याबाबत तक्रार हिंगणघाट पोलिसात दिली. पोलिसांनी या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
पोलीस योध्दा न्यूज नेटवर्क
महेश देवशोध ( राठोड )
वर्धा , जिल्हा प्रतिनिधी