BREAKING NEWS:
महाराष्ट्र हेडलाइन

निवडणूक : एक्झिट पोल आणि ओपिनियन पोल नेमका कसा ठरवतात ? दोन्हीत नेमका फरक काय असतो ?

Summary

मुंबई विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. 4 मे 2021 एकीकडे कोरोनाचा कहर सुरू असताना दुसरीकडे ४ राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात झालेल्या निवडणुकांचा निकाल काय लागतो, याच्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे. मतमोजणी होण्यापूर्वी प्रसारमाध्यमांतून तुम्ही एक्झिट पोलच्या आकड्यांचा खेळ […]

मुंबई विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. 4 मे 2021
एकीकडे कोरोनाचा कहर सुरू असताना दुसरीकडे ४ राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात झालेल्या निवडणुकांचा निकाल काय लागतो, याच्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे.
मतमोजणी होण्यापूर्वी प्रसारमाध्यमांतून तुम्ही एक्झिट पोलच्या आकड्यांचा खेळ पाहिला असेल. हे नेमके नेमका कसे काढतात व ओपिनियन पोल म्हणजे नेमके काय याबाबत हि माहिती करून घेतले पाहिजे.
एक्झिट पोल म्हणजे काय ? निवडणुका पार पडल्यानंतर ‘एक्झिट पोल’ घेण्यात येतो. आपल्या देशात संपूर्ण मतदान झाल्यानंतर एक्झिट पोल घेण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. मतदानाचा शेवटचा टप्पा पार पडला की, एक्झिट पोल जाहीर केला जातो. ज्या दिवशी मतदान प्रक्रिया पूर्ण होते, त्याच दिवशी मतदारांकडून माहिती गोळा केली जाते. म्हणजे काय… तर, प्रत्यक्ष मतदाराला विचारलं जाते की, कुणाला मतदान केले ? त्यापूर्वी संबंधित मतदान केंद्रावर किती मतदार आहे याची माहिती घेतलेली असते. त्याच्या आधारेच मतदान केंद्राची निवड केंद्राची निवड केलेली असते. मतदान करून आलेल्या पंधराव्या किंवा विसाव्या माणसाला नमुना म्हणून निवडले जाते. त्यांनी दिलेल्या उत्तरांचा सर्वे केला जातो. त्याआधारे संबंधित मतदारसंघात कोण बाजी मारणार याचा अंदाज व्यक्त केला जातो.
ओपिनियन पोल म्हणजे काय ? याचे सरळ साधे उत्तर द्यायचे झाले तर, मतदान होण्यापूर्वी जनमतांची चाचणी घेतली जाते. या चाचणीलाच ओपिनियन पोल म्हणतात. सहाजिकच ओपिनियन पोल हा मतदानापूर्वीच जाहीर केला जातो. यामध्ये होते काय, तर मतदान होण्यापूर्वी मतदारसंघांमध्ये जाऊन मतदाराशी चर्चा करून किंवा प्रश्न उत्तरे करून त्यांचा सर्वसाधारण कल जाणून घेतला जातो. त्यालाच जनमत चाचणी म्हंटले जाते. त्या चाचणीवरून ओपिनियन पोल ठरवला जातो.
दोन्ही पोलमध्ये नेमका फरक काय ? मतदानाआधी घेतलेला पोल हा ओपिनियन पोल असतो. तर, मतदानानंतर घेतलेला पोल हा एक्झिट पोल असतो.
मतदान होण्याआधी जनमत चाचणी घेऊ जाहीर केलेला ओपिनियन पोल हा बदलण्याची शक्यता जास्त असते.
मतदानानंतर प्रत्यक्ष लोकांशी संवाद साधल्यानंतर जो पोल जाहीर केला जातो त्याला एक्झिट पोल म्हणतात. दोन्हीपैकी जास्त विश्वास ठेवायचा झाला तर, एक्झिट पोलवर ठेवला जातो. मात्र, दोन्ही पोल हे व्यक्त केलेले अंदाजच असतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *