नामदार सुनिल केदार यांचे बुस्टर डोज नंतर कृषी विभाग एक्शन मोड वर वरिष्ठ कृषी अधिकारी शेतकर्यांच्या मळ्यावर संत्रा-मोसंबी फळगळ च्या प्रादुर्भावावर नियत्रणा साठी कार्यशाळा
Summary
काटोल/कोंढाळी-प्रतिनिधि-दुर्गाप्रसाद पांडे राज्याचे पशुसंवर्धन -क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी महा विकास आघाडी सरकारच्या योजना राज्यातील शेवटच्या नागरीकांपर्यंत पोहचाव्यात या करीता 21ऑगष्ट रोजी काटोल -नरखेड-येथे सर्व संबधित विभागाचे अधिकारी, जि प, पं तसेच ग्रा प चे स पदाधिकारी […]
काटोल/कोंढाळी-प्रतिनिधि-दुर्गाप्रसाद पांडे
राज्याचे पशुसंवर्धन -क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी महा विकास आघाडी सरकारच्या योजना राज्यातील शेवटच्या नागरीकांपर्यंत पोहचाव्यात या करीता 21ऑगष्ट रोजी काटोल -नरखेड-येथे सर्व संबधित विभागाचे अधिकारी, जि प, पं तसेच ग्रा प चे स पदाधिकारी सचीव व जनप्रतिनिधि यांची आढावा बैठक घेण्यात आली होती। या प्रसंगी काटोल चे डाक्टर अनिल ठाकरे, कृषी परिषद अध्यक्ष दिनेश ठाकरे यांनी या प्रसंगी काटोल तालुक्यातील संत्रा मोसंबी बागायतदारांची होनारी परखड व फळगळा बाबद प्रश्न उपस्थित केला होता या बाबद नामदार केदार यांनी कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकार्यां ची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात बोलावून शेतकर्यां च्या अडीअडचणी सोडविण्या बाबद निर्देश दिले होते। यिवरून
26/08/2021 रोजी तालुका काटोल व नरखेड येथील संत्रा व मोसंबी पिकावरील फळगळ संयुक्त पाहणी दौरा करण्यात आला सदर पाहणी करताना रवींद्र भोसले साहेब विभागीय कृषी सह संचालक,नागपूर.,मिलिंद शेंडे स जि. अ.कृ.अ. नागपूर ,CCRI नागपूर येथील शास्त्रज्ञ डॉ.अंबादास हुच्चे,डॉ. आशिष दास,डॉ. हरीश सवाई,डॉ. देवांनंद पंचभाई(सहयोगी अधिष्ठाता कृ. म.वि.नागपूर) डॉ. रमाकांत गजभिये (विभागप्रमुख उद्यानविद्या, कृषी महाविद्यालय नागपूर), प्रा.फ.सं. कें काटोल येथील शास्त्रज्ञ डॉ.प्रदीप दवणे (कीटक शास्त्रज्ञ )
डॉ. योगेश धार्मिक (उद्यानविद्यावेत्ता) डॉ.योगीराज जुमडे (उपविभागीय कृषी अधिकारी, काटोल) श्री. सुरेश कंन्नाके (ता.कृ.अ काटोल) उपस्थित होते .मौजा पारडी गो. येथील शेतकरी अमित महंत व डॉ. अनिल ठाकरे यांच्या मोसंबी बागेस तसेच शेषराव वानखेडे ढवलापूर, यांच्या संत्रा फळबागेस , खापरी केने येथील शेतकरी गोपाळ भक्ते ,नायगाव(ठाकरे) येथील घनश्याम ठाकरे ,झोलवाडी येथील शेतकरी ओमप्रकाश जुगसेनिया, उमठा येथिल शेतकरी दीपक वर्मा यांच्या मोसंबी बागेस भेट देऊन फळगळ पाहणी करण्यात आली व मार्गदर्शन करण्यात आले, या प्रसंगी प्रगतशील शेतकरी कृषी मित्र दिनेश ठाकरे, मनोज जवंजाळ,डॉ.अनिल ठाकरे ,काटोल चे पंचायत समिती च्या उपसभापती अनुराधा खराडे, नरखेड पंचायत समिती सभापती नीलिमा रेवतकर उपस्थित होते. त्यानंतर प्रा.फ. सं कें वंडली येथे काटोल आणि नरखेड व कळमेश्वर येथील शेतकरी बंधू व कृषी विभागातील म.कृ.अ,कृ.प,कृ.स यांना सध्याच्या परिस्थितीत फळगळीसाठी तातडीच्या उपाययोजना करण्यास CCRI चे व कृषी विद्यापीठ च्या शास्त्रज्ञानी पुढील उपाय योजना करण्यासाठी मार्गदर्शन केले होते.त्याचबरोबर फळगळ यासाठी उपाय योजना म्हणून
*संत्रा-मोसंबी फळगळ सल्ला*
१. वाढ होणाऱ्या आंबिया बहराच्या संत्रा मोसंबी फळझाडांसाठी शिफारस केलेल्या मात्रेमध्ये मुख्य (डीएपी १ किलो) व सूक्ष्म (१५० ग्रॅम झिंक सल्फेट) अन्नद्रव्यांच्या मात्रा द्याव्यात.
२. पावसामध्ये तीन-चार दिवसांचा सलग खंड पडल्यास जीए३ १.५ ग्रॅम+ कॅल्शिअम नायट्रेट १.५ किलो + १५ ग्रॅम स्ट्रेप्टोसायक्लिन १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणे. पंधरा दिवसांनी २,४-डी किंवा एनएए १.५ ग्रॅम + ३०० ग्रॅम बोरिक आम्ल+ थायोफनेट मिथाइल /कार्बेंडाज़िम १०० ग्रॅम+ मोनोपोटॅशिअम फॉसफेट (००:५२:३४) १.५ किलो १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणे.
३. सलग तीन चार दिवस पाउस लागून आल्यास झाडांवर ॲलिएट २.५ ग्रॅम ची फवारणी करणे. गरज पडल्यास दुसरी फवारणी मेटालॅक्झील ४%+ मॅनकोझेब ६४% या बुरशीनाशकाची २.५ ग्रॅम प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.