नागभीड नगर परिषदेचे वंसुधरा काॅलनीकडे दुर्लक्ष ; 🔹तात्काळ नाली बांधकाम करा 🔹 चंद्रशेखर नारायणे
Summary
चंद्रपूर प्रतिनिधी:- नागभीड नगर परिषद क्षेत्रातील प्रभाग क्र. 07 वंसुधरा कालनी येथील नागरिकांनी वंसुधरा काॅलनीमध्ये नालीचे बांधकाम करा अशी मागणी केली जात होती मात्र याकडे नगर परिषदेने व नगरसेवकांनी स्पष्ट दुर्लक्ष केले. नगर परिषदेच्या दुर्लक्षतेमुळे गेल्या 10 वर्षापासून पावसाळ्यात पावसाचे […]
चंद्रपूर प्रतिनिधी:- नागभीड नगर परिषद क्षेत्रातील प्रभाग क्र. 07 वंसुधरा कालनी येथील नागरिकांनी वंसुधरा काॅलनीमध्ये नालीचे बांधकाम करा अशी मागणी केली जात होती मात्र याकडे नगर परिषदेने व नगरसेवकांनी स्पष्ट दुर्लक्ष केले. नगर परिषदेच्या दुर्लक्षतेमुळे गेल्या 10 वर्षापासून पावसाळ्यात पावसाचे पाणी साचून घरात, अंगणात शिरल्याने नाहक त्रास सहन करावा लागत आहे. घरातील सांडपाणी जाण्यासाठी नाली नसल्याने सांडपाण्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. याकडे तात्काळ नागभीड नगर परिषदेने लक्ष देऊन नालीचे बांधकाम लवकरात लवकर करण्यात यावे अशी मागणी भारतीय क्रांतिकारी दिव्यांग संघटनेच्या वतीने तालुका महासचिव चंद्रशेखर नारायणे यानी नगर परिषदेचे मुख्याधिकारी यानां निवेदनाद्वारे केली आहे.