BREAKING NEWS:
महाराष्ट्र हेडलाइन

धोत्रा व सायंबा महाराज देवस्थानाला ” ब ” वर्ग दर्जा 2 कोटी रुपयां पर्यंत मिळणार निधी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची माहिती

Summary

सिल्लोड ( प्रतिनिधी ) दि.22, तालुक्यातील आराध्य दैवत श्री क्षेत्र सिध्देश्वर महाराज संस्थान , धोत्रा व पिंपळगाव पेठ येथील प्रसिद्ध देवस्थान श्री क्षेत्र सायंबा महाराज संस्थान या तीर्थक्षेत्राला ब वर्ग दर्जा प्राप्त झाला असल्याने या ठिकाणच्या तीर्थक्षेत्र विकासासाठी आता जवळपास […]

सिल्लोड ( प्रतिनिधी ) दि.22, तालुक्यातील आराध्य दैवत श्री क्षेत्र सिध्देश्वर महाराज संस्थान , धोत्रा व पिंपळगाव पेठ येथील प्रसिद्ध देवस्थान श्री क्षेत्र सायंबा महाराज संस्थान या तीर्थक्षेत्राला ब वर्ग दर्जा प्राप्त झाला असल्याने या ठिकाणच्या तीर्थक्षेत्र विकासासाठी आता जवळपास 2 कोटी रुपयांपर्यंत निधी प्राप्त करता येणार आहे. या देवस्थानच्या विकासासाठी प्रत्येकी 2 कोटी रुपयांचा निधी मिळावा यासाठी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला असून याबाबत सविस्तर विकास आराखडा करण्याच्या सूचना संबंधित विभागाला देण्यात आल्या आहे अशी माहिती देत धोत्रा व पिंपळगांव पेठ येथे तीर्थक्षेत्र विकास आराखडा करीत असतांना गावकऱ्यांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार यांनी पिंपळगांव पेठ येथे केले.

शुक्रवार ( दि.19 ) रोजी ना. अब्दुल सत्तार यांनी भवन सर्कल चा दौरा केला. यावेळी पिंपळगांव पेठ येथे गावकऱ्यांशी संवाद साधत असताना ना. अब्दुल सत्तार बोलत होते.

तालुक्यातील धोत्रा हे प्रसिध्द देवस्थान असून संस्थान ला मोठ्या प्रमाणावर यात्रा महोत्सवाची परंपरा लाभलेली आहे. येथे नवसपूर्ती साठी नेहमी भाविकांची वर्दळ असते. तर पिंपळगाव पेठ येथील सायंबा महाराज एक जागृत देवस्थान असून हिंदू – मुस्लिम एकतेचे प्रतीक म्हणून या देवस्थानचा उल्लेख केल्या जातो. पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर येथे मोठ्या उत्साहात यात्रा महोत्सव साजरा केला जात असतो. महाराष्ट्र – मराठवाड्यातील भाविक भक्त येथे दर्शनाला येतात. धोत्रा, पिंपळगाव पेठ येथे येणाऱ्या असंख्य भाविकांमुळे या तीर्थक्षेत्रास ‘क ‘ वर्गा ऐवजी ‘ ब’ वर्गाचा दर्जा मिळावा, जेणे करून भाविकांना अधिक सुविधा प्राप्त होतील. यासाठी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी संबंधित विभागाला शासनास प्रस्ताव सादर करण्याचा सूचना दिल्या होत्या. सदरील प्रस्तावाचा ना. अब्दुल सत्तार यांनी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. भाविकांची वाढती संख्या आणि श्री सिद्धेश्वर महाराज संस्थान धोत्रा व सायंबा महाराज संस्थानचे महत्व लक्षात घेता या तीर्थक्षेत्राचा विकास व्हावा म्हणून शासनाकडून ”ब” दर्जा देण्यात आला आहे. यामुळे याठिकाणी बाहेरून आलेल्या भाविकांसाठी भक्ती निवास , नवसपूर्ती साठी किचन शेड, पूजेसाठी शेड, रस्त्यांचा विकास, विद्युत रोषणाई , शौचालय, स्वच्छतागृह, बागबगीचा आदी मुलभूत सुविधांत वाढ होईल व तसेच विकासासाठी अधिक निधी देखील प्राप्त होणार आहे.
———————————————–
सोयगाव – सिल्लोड तालुक्यातील इतर तीर्थक्षेत्रांचा विकास व्हावा यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आलेला असून यासाठी पाठपुरावा करणे सुरू आहे. सोयगाव तालुक्यातील भैरवनाथ देवस्थान, मनुदेवी संस्थान बोरमाळ तांडा, ( सोयगाव ) तसेच सिल्लोड तालुक्यातील श्री. बलदेवदास महाराज देवस्थान, ( वरुड पिंप्री ) , यासह श्रीक्षेत्र मुरडेश्वर, इंद्रगढी ( घाटनांद्रा ) आमसरी इत्यादी देवस्थानच्या विकासासाठी नियमानुसार दर्जा देवून सदरील देवस्थान हे अजिंठा डोंगर रांगेत येत असल्याने येथे आध्यात्मसह निसर्गरम्य वातावरणाचा आविष्कार पहावयास मिळतो. यासाठी येथील देवस्थानाला पर्यटनाची जोड देऊन येथे भौतिक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी खासबाब म्हणून निधीची उपलब्धता करून देण्यासाठी सरकारच्या वतीने प्रयत्न सुरू असल्याची माहिती महसूल , ग्रामविकास राज्यमंत्री ना.अब्दुल सत्तार यांनी दिली.

धोत्रा व पिंपळगांव पेठे येथील देवस्थानाला ‘ब’ दर्जा मिळाल्याने या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी असलेल्या मूलभूत सुविधांत वाढ होणार आहे.महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार यांनी याबाबत पुढाकार घेतला होता. याबाबत शासनाने निर्णय घेतल्यामुळे ना. अब्दुल सत्तार यांच्या प्रयत्नाला यश आले आहेत. या निर्णयाबद्दल दोन्ही देवस्थानच्या वतीने ना. अब्दुल सत्तार तसेच राज्य सरकारचे आभार मानले आहे.
———————————————–
पिंपळगांव पेठ येथील सायंबा महाराज देवस्थानाला ब दर्जा देवून येथील तीर्थ क्षेत्राचा विकास साधण्यासाठी 2 कोटी निधीची तरदूत करण्यासाठी ना. अब्दुल सत्तार यांनी पुढाकार घेतल्या मुळे ना. अब्दुल सत्तार यांचे पिंपळगाव च्या गावकऱ्यांनी स्वागत करून आभार व्यक्त केले. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख देविदास लोखंडे, डॉ.संजय जामकर, कृउबा समितीचे सभापती अर्जुन पा गाढे, उपसभापती नंदकिशोर सहारे, हनिफ मुलतानी यांच्यासह सुभाष लोणकर, विजय भागवत, शिवाजी कोके, हनुमंत जगताप, अप्पा भोसले, नय्यु बेग मिर्झा, दादाराव भोसले, नवाब मिर्झा, हरी फुके, फारूक शहा, जगन बेलेवार, शामद शहा, दिलीप जाधव, पंढरीनाथ भोसले, एकनाथ हावळे, गणेश भोसले, अण्णा भागवत, गेंदालाल बेलेवार, केशव लोणकर, आतिक लोणकर, गणेश चिनके, फुलबेग मिर्झा, अंकुश भोसले आदी गावकऱ्यांची उपस्थिती होती.

पाेलिस योद्धा न्यूज नेटवर्क
सिल्लोड प्रतिनिधी
शेख चांद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *