*धनगर समाज, सत्यशोधक महिला एकता परिषद व्दारे जागतिक महिला दिन साजरा*
*नागपूर* कन्हान : – धनगर समाज महिला एकता परिषद व सत्यशोधक महिला परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने वाठोडा येथे जागतिक महिला दिन कार्यक्रमासह साजरा करण्यात आला.
सोमवार (दि.८) मार्च ला धनगर समाज महिला एकता परिषद व सत्यशोधक महिला परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने वाठोडा येथे जागतिक महिला दिन छायाताई कुरूटकर यांच्या अध्यक्षेत कार्यक्रमासह सावित्रीबाई फुलें च्या जीवनावर एकपात्री नाटक शो भाताई डहाके नी सादर केले. छायाताई कुरूटकर हयानी अध्यक्षीय भाषणातुन राजमाता जिजाऊ, क्रां तीज्योती सावित्रीबाई फुले, रमाई सह आदी महिला शक्ती महिमा विषयी महिलांना मौलाचे मार्गदर्शन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. सुत्रसंचा लन छायाताई वासनिक यांनी तर आभार शोभाताई डहाके हयानी व्यकत केले. कार्यक्रमाच्या यशस्विते साठी रेखा बीरे, सविता नासरे, मंगला बावनकर, वर्षा तिजारे, शकुंतला वांढरे, प्रमिला खानोरकर, प्रमिला ढवळे, ढेंगेताई, रुक्मिणी भोस्कर, मोना बिलोरे, खुशी हातझाडे, वंदना करमरकर, अनिता तांदुळकर, रजनी अग्रवाल, संगीता बिल्लोरे आदी महिलांनी सहकार्य केले.
संजय निंबाळकर
उपसंपादक