देऊळगाव बाजार वाढीव पाणी पुरवठा योजनेला 15 दिवसात मंजुरी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची ग्वाही

सिल्लोड ( प्रतिनिधी ) दि.7, देऊळगाव बाजार ता. सिल्लोड येथील पाणी प्रश्न लवकरच मार्गी लावण्यासाठी येथील वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठी तात्काळ सर्व्हे करून प्रस्ताव सादर करा असे निर्देश देत यासाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद करून येत्या 15 दिवसात या प्रस्तावास मंजुरी देण्यात येईल अशी ग्वाही महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार यांनी दिली.
रविवार ( दि.7 ) रोजी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी घाटनांद्रा जि. प. सर्कल चा दौरा केला. देऊळगाव बाजार येथील नागरिकांच्या समस्या व येथील नियोजित विविध विकास कामाच्या संदर्भात ना. अब्दुल सत्तार यांनी गावात भेट देवून गावकऱ्यांशी संवाद साधला याप्रसंगी ना. अब्दुल सत्तार बोलत होते.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख देविदास पा. लोखंडे, पंचायत समितीच्या सभापती डॉ. कल्पना जामकर, कृउबा समितीचे सभापती अर्जुन पा. गाढे, डॉ. मॅचिंद्र पाखरे,नगरसेवक सुधाकर पाटील, आर.एस.पवार, उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील, नायब तहसीलदार संजय सोनवणे, गटविकास अधिकारी डॉ. अशोक दांडगे , पंचायत समितीचे माजी उपसभापती अजीज बागवान,सरपंच शिवाजीराव देशमुख, उपसरपंच श्रीरंग कुंटे, श्री कदम यांच्यासह शासनाच्या विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलत असताना ना. अब्दुल सत्तार म्हणाले की, पूर्वी एका व्यक्तीला किमान 30 लिटर या प्रमाणे पाण्याची उपलब्धता सरकारच्या वतीने करण्यात येत होती. आता यात बदल करण्यात आला असून आता एका व्यक्तीला 55 लिटर याप्रमाणे पाण्याची उपलब्धता करण्यात येते. देऊळगाव बाजार येथे जीवन प्राधिकरण योजनेच्या माध्यमातून 1 लाख 60 हजार लिटर क्षमतेचा जलकुंभ उभारून घर तेथे नळ अशा पध्दतीने येथे वितरण व्यवस्था करण्यात येईल असे स्पष्ट करीत यासाठी निधी कमी पडू देणार नाही असे ना. अब्दुल सत्तार म्हणाले. गावातील नाले तसेच चारणा नदीचे खोलीकरण करून येथे साखळी बंधारे उभारणे, गावात ग्रामपंचायत व तलाठी कार्यालय उभारणे, देऊळगाव बाजार ते वाकोद या 3 किलोमीटर रस्त्याचे काम करणे, गावातील मंदिर व छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समोर सुशोभीकरण कामे करणे आदी विषयांवर सविस्तर चर्चा करून यासाठी सर्व्ह करून प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश ना. अब्दुल सत्तार यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.
यावेळी जि. प. बांधकाम विभागाचे उपअभियंता कल्याण भोसले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री. मराठे, जि. प.सिंचन विभागाचे उपअभियंता सय्यद साजिद,जि. प. पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता कोयलवार, लघु पाटबंधारे विभागाचे सहायक अभियंता योगेश घुले, आरोग्य विभागाचे डॉ. वाघमारे, विस्तार अधिकारी पी.बी.दौड, मंडळ अधिकारी श्री. जैस्वाल यांच्यासह गावातील गणेश गरुड, शैलेश साळवे, दीपक सोनवणे, हरीश देशमुख, भगवान जंजाळ, प्रकाश सोने, सिकंदर लाला,अशोक सोमासे,अजीज देशमुख, बाबासाहेब देशमुख, डॉ.शेरू आदिंची उपस्थिती होती.
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
मराठवाडा
शेख चांद
सिल्लोड