हेडलाइन

दुर्गम असलेल्या भोरगड मध्ये सुरु होणार इंग्रजी शाळा  सलील देशमुख यांच्या प्रयत्नांना यश

Summary

दुर्गम असलेल्या भोरगड मध्ये सुरु होणार इंग्रजी शाळा सलील देशमुख यांच्या प्रयत्नांना यश काटोल, प्रतिनीधी आदीवासी विभागाच्या वतीने भोरगड येथे निवाशी आश्रम शाळा सुरु होती. परंतु ती बंद पडल्याने कोटयावधी रुपयाची प्रशस्त ईमारत ही धुळखात पडली होती. या दुर्गम भागात […]

दुर्गम असलेल्या भोरगड मध्ये सुरु होणार इंग्रजी शाळा

सलील देशमुख यांच्या प्रयत्नांना यश

काटोल, प्रतिनीधी

आदीवासी विभागाच्या वतीने भोरगड येथे निवाशी आश्रम शाळा सुरु होती. परंतु ती बंद पडल्याने कोटयावधी रुपयाची प्रशस्त ईमारत ही धुळखात पडली होती. या दुर्गम भागात इंग्रजी शाळा होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेता जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांनी सातत्याने मुंबई पासुन ते नागपूर पर्यत प्रयत्न केले. अनेक वेळा त्यांनी आदिवासी विभागाचे अप्पर आयुक्त रविंद्र ठाकरे यांच्यासोबत बैठका घेतल्या. अखेर प्रयत्नाना यश आले असून येत्या जुन महिन्यापासुन इंग्रजी शाळा होणार असल्याची माहिती सलील देशमुख यांनी दिली आहे.

भोरगड येथेली आदिवासी निवासी आश्रम शाळेच्या विकासासाठी माजी गृहमंत्री आमदार अनिल देशमुख यांनी बरेच प्रयत्न केले. ३५० विदयार्थ्यांच्या राहण्यासोबत शिक्षणासाठी येथे सोय उभी करण्यात आली. १४ अदयावत वर्गखोल्या, प्रशस्त वस्तीगृह सोबत कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी क्वार्टर अशी ३ मजली भव्य ईमारत उभारण्यासाठी अनिल देशमुख ४ कोटी १४ लाख ८७ हजार रुपयाचा निधी खेचून आणला होता. निसर्ग रम्य वातावरणात जवळपास ८ एकर परिसरात ही निवाशी आश्रम शाळा निर्माण करण्यात आली होती. परंतु मधल्या काळात ही निवासी आश्रम शाळा बंद करण्यात आली. २०१४ ते २०१९ पर्यत ही प्रशस्त वास्तु धुळखात पडली होती.

अनिल देशमुख यांनी कोटयावधी रुपयाचा निधी मंजुर करुन उभारलेली ही वास्त धुळखात पडली आहे, ही बाब सलील देशमुख याच्या मनात होती. अनेकदा त्यांनी भोरगड येथे जावुन या वास्तुची पाहणी सुध्दा केली. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येताच सलील देशमुख यांनी येथे ग्रामिण भागातील विदयार्थ्यांसाठी काय करता येईल याची चाचपणी सुरु केली. अधिकारी व पदाधीकारी यांच्यासोबत चर्चा केली. अनेक प्रस्ताव समोर सुध्दा आले, परंतु तांत्रीक बाबीमुळे ते शक्य होत नव्हते. शेवटी सलील देशमुख यांनी यापैकी आलेला एक प्रस्ताव म्हणजे दुर्गम भागातील विदयार्थ्यांना इंग्रजी माध्यमाचे शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न सुरु केले. राज्य शासनच्या स्तरावर प्रयत्न सुरु करण्यात आले. मध्यल्या काळात कोरोना आला आणि परत अडचण निर्माण झाली होती. असे असतांनाही सलील देशमुख यांनी आपला पाठपुरवा सुरुच ठेवला.

शेवटी सलील देशमुख यांच्या प्रयत्नांना यश आले असून आदीवासी विभागाच्या वतीने येथे इंग्रजी शाळा मंजुर झाली असुन शाळा सुरु करण्याची प्रयक्रीया सुरु करण्यात आली. पहील्या टप्प्यात पहील्या वर्गाला मान्यता मिळाली असून नंतर ती ८ पर्यत मिळत जाणार आहे. यानंतर पुढे १० किंवा त्यापेक्षा पुढील वर्गाला मान्यता मिळण्यासाठी सुध्दा प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहीती सलील देशमुख यांनी दिली आहे. या इंग्रजी शाळेला मंजुरी दिल्याबदल सलील देशमुख यांनी महाविकास आघाडी सरकारचे आभार मानीत या शाळेत पालकांनी सुध्दा आपल्या पाल्याचा येथे प्रवेश करावा असे आवाहन त्यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *