दारू बंदी जिल्ह्यात अवैध दारू विक्रीमुळे गावातील कायदा आणि सुव्यवस्था विस्कळीत?
Summary
गडचिरोली/ जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असुनही अवैध दारू विक्रीमुळे अनेक गावात शांतता, कायदा आणि सुव्यवस्था विस्कळीत झाली आहे. ग्रामीण परिसरात अवैध दारू मोठ्या प्रमाणात आयात केली जात असल्याने गडचिरोली सारख्या पोलीस यंत्रणा सज्ज असलेल्या जिल्ह्यात भरदिवसा खुलेआम दारू विक्रीमुळे […]
गडचिरोली/ जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असुनही अवैध दारू विक्रीमुळे अनेक गावात शांतता, कायदा आणि सुव्यवस्था विस्कळीत झाली आहे. ग्रामीण परिसरात अवैध दारू मोठ्या प्रमाणात आयात केली जात असल्याने गडचिरोली सारख्या पोलीस यंत्रणा सज्ज असलेल्या जिल्ह्यात भरदिवसा खुलेआम दारू विक्रीमुळे पोलीसांच्या कार्यकुशलतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. पोलिसांचे याकडे कमालीचे दुर्लक्ष होत आहे का❓असाही प्रश्न निर्माण झाला आहे. कमी श्रमात झटपट जास्त पैसा कमविण्यासाठी युवा पिढी सह महिला सुद्धा दारू विक्रीचा व्यवसायात उतरल्या आहेत़.अवैध दारू विक्रीमुळे अनेक ठिकाणी शांतता, कायदा आणि सुव्यवस्था विस्कळीत झाली आहे यासाठी पोलीस प्रशासन जबाबदार असल्याचे जनचर्चेतुन ऐकावयास मिळत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातही दारू बंदी करण्यात आली आहे. तरीही तालुक्यातील अनेक ठिकाणी दारूचा अवैध व्यवसाय खुलेआम सुरु आहे. यासाठी कोणत्या बड्या नेत्याचे आणि अधिकाऱ्याचे वरदान लाभले आहे का❓ असाही प्रश्न चर्चेतून ऐकायला मिळतो. खुलेआम सुरु असलेल्या अवैध दारू विक्रीमुळे सर्वसामान्य नागरिकांना, रस्त्यावरून ये- जा करणाऱ्या विध्यार्थी आणि महिलांना त्रास होत आहे. प्रवासात असताना मात्र बेवड्यांकडे दुर्लक्ष करून आपले काम केले जाते.त्यामुळे कोणी तक्रार दाखल करण्यास पूढे येत नाही. दारू बंदीच्या काळात दुप्पट रक्कम मोजून बेवडे शौकीन आपले शौक पुर्ण करण्यासाठी गल्लीबोळात फिरताना दिसून येतात. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी पोलीस स्टेशन आहे. हे निविर्वाद सत्य आहे. हे पोलीस प्रशासन,वरिष्ठ पोलीस अधिकारी, लोकप्रतिनिधी,गृहमंत्रालय नाकारू शकत नाही. तरीही खुलेआम दारू विक्री होत आहे. या गंभीर बाबीकडे प्रशासनाने पराकोटीने लक्ष द्यावे. अशी मागणी जनसामान्यांच्या चर्चेतून होत आहे.