तीन अवैध दारू विक्री करणारे तसेच गाळणाऱ्यांवर वरठी पोलिसांची कार्यवाही
पोलीस ठाणे वरठी अंतर्गत अवैधरित्या दारू विक्री करणारे व गाळणारे अशा तीन व्यक्तींवर दारूबंदी कायद्यान्वये कार्यवाही करण्यात आली असून आरोपीतांकडून एकूण वीस हजार तीनशे रुपयाचा माल जप्त करण्यात आला तसेच अवैधरित्या सट्टा पट्टी वर जुगाराचा व्यवसाय करणाऱ्या दोन व्यक्ती वर कार्यवाही करण्यात आली असून आरोपी तानकडून एकूण 755 रुपयाचा माल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच मोटार वाहन नियमांचे उल्लंघन कार्यवाही करण्यात आली असून त्यांच्याकडून एकूण 1900 रुपये दंड आकारण्यात आला आहे. सदरची कार्यवाही प्रभारी ठाणेदार श्रिनिवस यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार प्रकाश उके, राम रतन खोकले, सचिन गभने, घनश्याम गोमासे, आकांत रायपूरकर यांनी केली आहे.
अमर वासनिक
न्यूज एडिटर
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
7774980491