डॉ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे आक्रोश आंदोलन
Summary
दिलीप भूयार/पश्चिम नागपुर प्रतिनिधी अघोषित नैसर्गिक वाढीच्या वर्ग तुकड्यांना त्वरित प्रचलित नियमानुसार अनुदान देण्यात यावे या मागणीसाठी 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन संपूर्ण महाराष्ट्रभर काळ्या फिती लावून काळा दिवस पाळण्यात आलालातूर मान्यताप्राप्त अनुदानित शाळेमध्ये शैक्षणिक वर्ष 2012 13 मध्ये नैसर्गिक […]
दिलीप भूयार/पश्चिम नागपुर प्रतिनिधी
अघोषित नैसर्गिक वाढीच्या वर्ग तुकड्यांना त्वरित प्रचलित नियमानुसार अनुदान देण्यात यावे या मागणीसाठी 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन संपूर्ण महाराष्ट्रभर काळ्या फिती लावून काळा दिवस पाळण्यात आला
लातूर मान्यताप्राप्त अनुदानित शाळेमध्ये शैक्षणिक वर्ष 2012 13 मध्ये नैसर्गिक वाढीच्या वर्ग तुकड्या देण्यात आल्या या तुकड्यांना चार वर्षानंतर प्रत्येक वर्षी 20 टक्के 40,60,80,100 टक्के अनुदान देण्यात येईल असा शासनाचा जीआर सुद्धा होता पण शासनाने आजपर्यंत यांना अनुदान दिलेलं नाही**आज अघोषित नैसर्गिक वाढीच्या वर्ग तुकड्या म्हणून त्या मुंबई स्तरावर आहे पण यावर कुठलाही निर्णय शासन घेत नाही आणि अनुदान सुद्धा देण्याचा विचार करत नाही* *गेल्या सात-आठ वर्षांपासून विनावेतन पवित्र ज्ञानदानाचे कार्य शिक्षक करत आहे पण त्याला आज वेतन दिलं जात नाही त्यामुळे तो प्रचंड उपास मारीन आज तडफडून मरतो आहे ,त्याच कुटुंब उद्ध्वस्त होत आहे, तो आत्महत्या करून आपले जीवन संपवतो आहे पण याचा विचार कोणताही मंत्री किंवा शासन करत नाही
महाराष्ट्रातील सर्व अघोषित नैसर्गिक वाढीच्या वर्ग तुकड्यांना त्वरित प्रचलित नियमानुसार अनुदान द्यावे आणि त्यांचे उद्ध्वस्त होणारे कुटुंब वाचवावे यासाठी* *डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेने आक्रोश आंदोलन करून संपूर्ण महाराष्ट्रभर 5 सप्टेंबर या शिक्षक दिनी काळ्या फिती लावून काळा दिवस पाळण्यात आला व शासनाचा जाहीर निषेध सुद्धा करण्यात आला
अघोषित नैसर्गिक वाढीच्या वर्ग तुकड्यांना त्वरित प्रचलित नियमानुसार अनुदान देण्यात आले नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेच्या वतीने तीव्र आंदोलन करणार अशी माहिती राज्य सन्यवयक शामराव लवांडे यांनी दिली
दिलीप भुयार
पश्चिम नागपूर प्रतिनिधी
9503309676