BREAKING NEWS:
महाराष्ट्र हेडलाइन

*डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय हिरकणी पुरस्कार वितरण सोहळा संपन्न.*

Summary

*आज दिनांक 10-03-2021 रोजी लातूर येथे डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय हिरकणी पुरस्कार लातूर जिल्ह्याच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या उपशिक्षणाधिकारी श्रीमती तृप्तीताई अंधारे मॅडम यांना सरस्वती विद्यालय प्रकाश नगर लातूर येथे प्रदान करण्यात आला.* *एक हिरा […]

*आज दिनांक 10-03-2021 रोजी लातूर येथे डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय हिरकणी पुरस्कार लातूर जिल्ह्याच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या उपशिक्षणाधिकारी श्रीमती तृप्तीताई अंधारे मॅडम यांना सरस्वती विद्यालय प्रकाश नगर लातूर येथे प्रदान करण्यात आला.*
*एक हिरा दुसऱ्या हिऱ्याची पारख करू शकतो कारण तुम्ही माझी राज्यस्तरीय हिरकणी पुरस्कारासाठी पारख केलत हीच माझ्यासाठी अतिशय मोठी गोष्ट आहे. ज्या पद्धतीने हिरकणी ने बुरुज उतरून आई काय असते याची इतिहासात नोंद केली . हिरकणी चे उदाहरण डोळ्यासमोर ठेवून आजची आई ग्रहणी पासून ते क्लास वन ऑफिसर बनू शकते आई कोणताही संघर्ष करू शकते ज्या पद्धतीने हिरकणी ने सर्व सांभाळून आपले कार्य प्रामाणिकपणे केले होते त्याच पद्धतीने सर्व महिलांनी सुद्धा हिरकणी सारखे कार्य केले पाहिजे, मी एक शिक्षिकाच होते पण स्पर्धा परीक्षा देऊन मी आज उपशिक्षणाधिकारी म्हणून कार्य करत आहे .सर्व स्त्रियांनी सुद्धा शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभा राहिल पाहिजे ,सक्षम झाले पाहिजे. प्रत्येक माणसाने जर आपल्यातील क्षमता ओळखली तर कोणतेही कार्य करू शकतो ,आज जो मला राज्यस्तरीय हिरकणी पुरस्कार डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेने दिलेला आहे तो माझ्यासाठी अतिशय खूप मोठा हा पुरस्कार आहे.*

*मा.श्री शेळके सर यांनी हिरकणी पुरस्काराचे वाचन केले व ज्या पद्धतीने हिरकणी ने सर्व सांभाळून कार्य केले त्याच पद्धतीने आपण कार्य करत आहात असे ते म्हणाले.*
*प्रमुख पाहुणे श्री चोले सर यावेळी बोलताना म्हणाले की, तृप्ती ताई अंधारे मॅडम यांची काम करण्याची पद्धत अतिशय चांगली आहे त्यांनी ज्ञानरचनावादानुसार सर्वांना शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी त्यांनी महाराष्ट्रभर प्रयत्न केले आणि त्याची अंमलबजावणी सुद्धा होत आहे असे ते म्हणाले.*
*अध्यक्षीय समारोप करताना श्री साळुंके सर म्हणाले की, ज्या पद्धतीने तुम्ही शिक्षक असतानासुद्धा स्पर्धा परीक्षा देऊन आज उपशिक्षणाधिकारी म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीने कार्य करत आहात त्यामुळेच डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचा राज्यस्तरीय हिरकणी पुरस्कार मिळालेला आहे कारण तुम्ही शिक्षण क्षेत्रांमधील खरंच हिरकणी आहात म्हणून हा पुरस्कार तुम्हाला दिलेला आहे तर सर्व महिलांनी सुद्धा तृप्ती ताई अंधारे मॅडम यांचा आदर्श घ्यावा आणि अधिकारी पदी रुजू होऊन कार्य करावं असं ते म्हणाले,*
*कार्यक्रमाचं प्रास्ताविक श्री शामराव लवांडे सर यांनी मांडले ते प्रास्ताविक मांडत असताना म्हणाले की, डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद ही शिक्षक, पालक, विद्यार्थी यांचे प्रश्न सोडविण्यासाठी व त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्नशील असते व न्याय मिळवून देते .डॉ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष पप्पू पाटील भोयर साहेब व प्रदीप दादा सोळंके प्रदेशाध्यक्ष (माध्यमिक) तसेच माननीय श्री लक्ष्मण नेहल साहेब प्रदेशाध्यक्ष (प्राथमिक) यांच्या मार्गदर्शनानुसार शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांना , अधिकाऱ्यांना महात्मा ज्योतिबा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार व हिरकणी पुरस्कार ,जीवन गौरव पुरस्कार, असे विविध पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात येते.*
*श्रीमती तृप्ती ताई अंधारे मॅडम यांनी सुद्धा शिक्षक ते उपशिक्षणाधिकारी असा त्यांनी एक खडतर प्रवास पूर्ण केला आहे .आज त्या उपशिक्षणाधिकारी म्हणून लातूर जिल्ह्याचा कारभार पाहतात शिक्षण क्षेत्रामध्ये भरीव असे कार्य केल्यामुळेच आज तृप्ती ताई अंधारे मॅडम यांना राज्यस्तरीय हिरकणी पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे असे ते म्हणाले,*
*यावेळी राज्यस्तरीय हिरकणी पुरस्कार वितरण सोहळ्याचे अध्यक्ष- बाल विकास शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक -आदरणीय श्री चंद्रकांत काशिनाथराव साळुंके, प्रमुख पाहुणे -लातूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव व विद्याविकास विद्यालयचे मुख्याध्यापक मा.श्री बजरंग चोले सर, सरस्वती विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री कालिदास शेळके सर, सरस्वती प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री बिराजदार सर, सरस्वती विद्यालयाचे उपमुख्याध्यापक मा.श्री देशमुख सर, स्वामी दयानंद विद्यालय कव्हा येथील मुख्याध्यापिका श्रीमती अरुणा कांदे मॅडम, माजी मुख्याध्यापक श्री पाटील सर, डॉ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे राज्य समन्वयक -श्री शामराव लवांडे सर, मराठवाडा विभागीय अध्यक्ष-श्री लक्ष्मण डोंगरे सर,मराठवाडा विभागीय सचिव-श्री शिवशंकर स्वामी सर, लातूर जिल्हा उपाध्यक्ष श्री अशोक नाटकरे सर, लातूर जिल्हासचिव श्री दत्ता माने सर ,लातूर जिल्हा सहसचिव श्री अमित तुमकुटे सर, श्री मुकेश लाटे सर , श्री नवनाथ पेठकर सर, श्री दत्ता हंचाटे सर,श्रीमती अरुणा कांदे मॅडम, श्रीमती शेळके मॅडम, श्रीमती चेन्नागिरे मॅडम, श्रीमती गोंदकर मॅडम श्रीमती स्वामी मॅडम, श्रीमती गुंजाळ मॅडम ,श्रीमती देशमुख मॅडम, श्रीमती नकाते मॅडम, व संघटनेचे सर्व पदाधिकारी, तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक बंधू भगिनी कार्यक्रमासाठी उपस्थित होते.*
*कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सूत्रसंचलन श्री शामराव लवांडे सर यांनी केले व कार्यक्रमाचे आभार श्रीमती अरुणा कांदे मॅडम यांनी मांडले*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *