BREAKING NEWS:
देश महाराष्ट्र हेडलाइन

डॉ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद नागपूर विभाग तर्फे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी.

Summary

नागपूर डॉ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद नागपूर विभाग तर्फे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती लालबहादूर शास्त्री मनपा,विद्यालय हनुमान नगर येथील सभागृहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षास्थानी जिजाऊ ब्रिगेड प्रदेश उपाध्यक्षा सुनिताताई जिचकार होत्या. प्रमुख वक्त्या छायाताई कुरुडकर होत्या. आजच्या […]

नागपूर डॉ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद नागपूर विभाग तर्फे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती लालबहादूर शास्त्री मनपा,विद्यालय हनुमान नगर येथील सभागृहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षास्थानी जिजाऊ ब्रिगेड प्रदेश उपाध्यक्षा सुनिताताई जिचकार होत्या. प्रमुख वक्त्या छायाताई कुरुडकर होत्या. आजच्या सामाजिक परिस्थितीचा आढावा घेत शिक्षक हा सामाजाचा मुख्य घटक आहे आणि समाजाची भोंगळ व्यवस्था बदलायची असेल तर शिक्षकांनी पुढे येण्याची गरज आहे असे छाया कुरुडकर यांनी सांगितले. बऱ्याच प्रयत्नांनांतर आजचा दिवस हा महिला शिक्षण दिवस म्हणून साजरा करण्यात येत आहे यापुढे फुले दाम्पत्याना संयुक्त भारतरत्न देण्याची मागणी डॉ पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद करेल असे संघटनेच्या नागपूर विभागीय प्रवक्त्या कीर्ती काळमेघ वनकर म्हणाल्या, समाजाला सावित्रीची आजही गरज आहे असे विचार कार्यक्रमाच्या अध्यक्षा आणि जिजाऊ ब्रिगेड प्रदेश उपाध्यक्षा सुनिता जिचकार यांनी अध्यक्षीय भाषणात मांडले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून परिषदेचे राज्य उपाध्यक्ष शांताराम जळते, विभागीय अध्यक्ष संजय निबाळकर,सौं.वंदना वनकर अध्यक्ष अ. भा. स. महिला शिक्षक व शिक्षकेत्तर, मुख्यध्यापक संजय पुंड माध्य जिल्हाध्यक्ष नंदलाल यादव,सचिव संजीव शिंदे,सहसचिव गुणवंत देवाडे,समीर शेख,प्राथमिक जिल्हाधक मेघराज गवखरे, सम्पर्क प्रमुख सुरज बमनोटे, हिंगणा तालुका अध्यक्ष,अतुल बोबडे, प्रवीण मेश्राम, लोकोत्तम बुटले, विनोद चिकटे,गजानन कोंगरे,गौरव शिंदे प्राथमिक कार्यध्यक्ष,पक्षभान ढोक ,उत्तर विभाग महिला संघटनक प्रिया इंगळे,सावनेर तालुका महिला संघटक पुष्पा कोंडलवार, मारोती देशमुख सर विनोद मांडवकर, ममता मांडवकर, संगीता शिंदे,प्रामुख्याने उपस्थित होते. संचालन संजय शिंदे यांनी केले तर आभार नंदा वाळके यांनी मानले.
संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
9579998535

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *