ज्येष्ठ साहित्यिक सतीश काळसेकर यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली
Summary
मुंबई, दि. 24 :- ‘साहित्य अकादमी’ पुरस्कार विजेते ज्येष्ठ साहित्यिक, संपादक, सामाजिक कार्यकर्ते सतीश काळसेकर यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दु:ख व्यक्त केले असून प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध बंड करणारा, दुर्बल-वंचिताचं जगणं साहित्यातून जिवंत करणारा सिद्धहस्त लेखक, साहित्य चळवळीतलं विद्रोही व्यक्तिमत्व […]
मुंबई, दि. 24 :- ‘साहित्य अकादमी’ पुरस्कार विजेते ज्येष्ठ साहित्यिक, संपादक, सामाजिक कार्यकर्ते सतीश काळसेकर यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दु:ख व्यक्त केले असून प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध बंड करणारा, दुर्बल-वंचिताचं जगणं साहित्यातून जिवंत करणारा सिद्धहस्त लेखक, साहित्य चळवळीतलं विद्रोही व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेलं आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार शोकसंदेशात म्हणतात की, मराठी साहित्यविश्वात लीलया मुशाफिरी करणाऱ्या सतीश काळसेकरांनी लघुनियतकालिक चळवळीच्या माध्यमातून मराठी साहित्य विश्व समृद्ध केलं. राज्यातल्या लेखक-वाचकांना एकत्र आणलं. वंचित, दुर्बल घटकांना न्याय देण्यासाठी साहित्यातून प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध बंड पुकारलं. संवादावर विश्वास असलेले, माणसं जोडणारं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. त्यांच्या सहवासात आलेले, त्यांनी घडवलेले अनेक जण आज साहित्य, पत्रकारिता, समाजसेवेच्या क्षेत्रात योगदान देत आहेत. सतीश काळसेकर यांचं निधन महाराष्ट्राच्या साहित्य चळवळीची मोठी हानी आहे, मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.