BREAKING NEWS:
महाराष्ट्र हेडलाइन

ज्ञान, अनुभव, समयसूचकता, प्रसंगावधान, आणि कामाप्रति समर्पण .? – जवळ आलेल्या मृत्यूलाही कशी हुलकवणी देता येते* — 6 may ला रात्री मुंबईत जणू प्रात्यक्षिक झाले.

Summary

मुंबई विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. 16 मे. 2021:- मुरादाबाद येथील एका रुग्णास lungs चा असाध्य आजार झाला होता.सर्व उपाय थकल्यावर शेवटी lungs transplant हा एकच उपाय शिल्लक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अशी शस्त्रक्रिया मुंबईत चांगल्या प्रकारे होत असल्याने रुग्णास मुंबईला […]

मुंबई विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. 16 मे. 2021:-
मुरादाबाद येथील एका रुग्णास lungs चा असाध्य आजार झाला होता.सर्व उपाय थकल्यावर शेवटी lungs transplant हा एकच उपाय शिल्लक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अशी शस्त्रक्रिया मुंबईत चांगल्या प्रकारे होत असल्याने रुग्णास मुंबईला हलवावे असे ठरले पण रुग्ण अत्यवस्थ असल्याने Air Ambulance म्हणजे विमानानेच हलवावे असे ठरले. मग Jet airways ची air ambulance पक्की केली व रुग्णास घेऊन ते विमान मुंबईकडे रवाना झाले खरे, पण भविष्यात कोणते ताट नियतीने आपल्यासाठी वाढून ठेवले आहे याची कोणालाच कल्पना नव्हती! त्या विमानाचे चालक होते कॅप्टन केसरी सिंग अत्यंत कुशल, अनुभवी व असामान्य धीराचे वैमानिक असा त्यांचा लौकिक आहे..मुरादाबादहुन निघाल्यावर मुंबईत पॅसेंजरला सोडायचे, परत येताना पुण्यात पेट्रोल भरून परतायचे असा त्यांचा प्लॅन होता पण त्या प्लॅनला खो बसला. पुण्याची हवा खराब होती. कदाचित लँडिंग होऊ शकले नसते. मग केसरी सिंगानी विचार केला आणि वाटेतच असलेल्या नागपूर विमानतळावर पेट्रोल भरावे असे ठरले व तशी परवानगीही त्यांना मिळाली. त्यांनी थोडा विचार करून थोडे अधिकच पेट्रोल भरले. नागपूर विमानतळावर *रविकांत अवला या Central Industrial Security Force चे हेड कॉन्स्टेबल ड्युटीवर होते. त्या दिवशी watch tower वर ड्युटी देत होते. रनवे, येणारी जाणारी विमाने, आणि आजूबाजूला होणाऱ्या हालचाली, घडामोडी यावर लक्ष ठेवणे हे त्यांचे काम असते. त्या दिवशी साधारण साडेपाच वाजता अवला यांनी एक विमान take off करताना पाहीले. त्या आधीही त्यांनी ती air ambulance लँड होताना पाहिली होती. सवयीप्रमाणे त्यांनी त्या विमानाला दूर पर्यंत जाई तो पाहीले आणि *अचानक त्यांना ती गोष्ट दिसली, त्या विमानातून एक वस्तू अचानक खाली पडली! हे कसे शक्य आहे? विमान फारतर 400 मीटर दूर गेले असेल. त्याने ताबडतोब कंट्रोल रूमला ही बातमी कळवली. कंट्रोल रूम मधील अधिकाऱ्याचा या माहितीवर विश्वास बसला नाही पण त्यांनी हलगर्जीपणा न करता त्या वैमानिकाला म्हणजे आपल्या केसरी सिंग यांना कॉन्टॅक्ट करून तुमची वस्तू पडली आहे काय हे विचारले. त्यांनी पाहणी करून असं काही नसल्याचं सांगितले. पण आपल्या Constable अवला यांचे समाधान झाले नाही. ही काही साधारण घटना नाही हे त्यांना जाणवत होते. त्यांनी आपले काम बाजूच्या सहकाऱ्यांवर सोपवले आणि आपली बाईक घेऊन ती पडलेली वस्तू शोधण्यासाठी निघाले. थोडया दुरवर गेल्यावर त्यांना ती वस्तू दिसली. ते चक्क त्या विमानाचे टायर होते! त्यांनी त्या टायरचा फोटो घेतला व कंट्रोलरूमला कळवले. कंट्रोल रूमने ताबडतोब तो फोटो कॅप्टन केसरीसिंग यांना पाठवला व हे टायर तुमच्या विमानाचे आहे काय हे विचारले. केसरीसिंग यांनी तो फोटो विमानाच्या कंपनीला पाठवला व हे टायर आपलेच आहे काय ते विचारले. कंपनीने होकार दिला. विमान हवेत गेले की त्याची चाके आपोआपच पोटात जातात. हवेशी घर्षण होऊन झिज टाळावी व वेगावर परिणाम होऊ नये म्हणून ही व्यवस्था असते.आता *कॅप्टन केसरी सिंग यांना विमानाचे belly landing म्हणजे ते विमान चक्क पोटावरच उतरावे लागणार होते! होय. ही belly landing ही अतिशय भयानक गोष्ट असते. यात विमान आणि जीव वाचण्याची शक्यता शून्य असते. कॅप्टन केसरी सिंग यांच्या माहितीनुसार त्यांना माहीत असलेल्या सगळ्या belly landing मधील व्यक्ती या मरणच पावल्या होत्या पण केसरीसिंग हे धिरोदात्य व्यक्तिमत्व आहे. त्यांनी शांतपणे एक एक निर्णय घेण्यास सुरुवात केली. धीरोदात्त, अशावेळी न डगमगता मृत्यू समोर नक्की असताना केवळ logical निर्णय घेण्यास फार महान प्रज्ञा लागते. विमानाला चाक नव्हते. आत अतिगंभीर रुग्ण होता, डॉक्टर होते, नातेवाईक होते, कोपायलट होता. सर्वांचे प्राण वाचवायचे होते. तोपर्यंत विमान औरंगाबाद पर्यंत आले होते. कॅप्टन आता अशा विषयातील कोण तज्ञ आहे त्यांची नावे आठवू लागले. आणि त्यांना नाव आठवले, कॅप्टन हीर! त्यांनी टॉवरला कॅप्टन हीर यांच्याशी संपर्क करून द्यायला सांगितले. कॅप्टन हीरना ते जिथे असतील तेथून जवळच्या विमानातळावर जाण्याचा आदेश निघाला. ते बिचारे सुट्टीवर होते पण त्यांनी धावतपळत राऊरकेला विमानतळ गाठलं. मग दोघे मिळून एक एक निर्णय घेऊ लागले. विमानात भरपूर इंधन भरले गेले होते. इतक्या इंधनासकट लँड झाल्यास निश्चितपणे स्फोट झाला असता. तेव्हा आधी इंधन संपवावे लागणार होते. ते काही फेकता येत नसते. मग ते वापरूनच संपवावे लागले असते. म्हणजे ते विमान चक्क अजून अडीच तास हवेतच फिरवावे लागणार होते पण तेही सोपे नसते. तितके फिरवायला जागा लागते. इतर विमानांचे timings तपासावी लागतात. मुंबईत दर मिनिटाला एक विमान उतरत वा चढत असते. त्यांचे काय करायचे? शिल्लक इंधन आणि उतरण्याचे timing याचे गणित मोठे अवघड असते. तेही जुळवावे लागणार होते. शेवटी विमान दोन तास फिरवण्यास जागा आणि वेळ दिली गेली.आपले टायर खरंच निखळले आहे काय याची केसरसिंग यांना खात्री करायची होती. मग त्यांनी खाली कंट्रोल टॉवरला निरोप दिला की मी एकदा एकदम खालून एक फेरी मारतो. 200 मीटर वरून. तुम्ही खालून पाहून मला सांगा. खालून दुर्बीण लावून पाहून टॉवरने निरोप दिला की, होय टायर निखळले आहे.इंजिन फिरत ठेऊन पेट्रोल जाळणे सुरु झाले. एका ठराविक उंचीवर आले की विमानाची दोन्ही इंजिन्स बंद करायची, सर्व इलेक्ट्रॉनिक्स यंत्रणा बंद करायच्या अशा सूचना होत्या. त्यामुळे आग लागण्याची शक्यता थोडीशी कमी होत होती.इकडे फायर ब्रिगेड, आपत्कालीन व्यवस्था कामास लागली. खास ऍम्ब्युलन्स आणली गेली. CIASF चे जवान धावपट्टीच्या दोन्ही बाजूस तैनात झाले. कॅप्टन विमान लँड करण्यासाठी तयार झाले आणि परत एक संकट आले. विमानाचे head lights हे टायर आत बाहेर करणाऱ्या यंत्रणेशी संलग्न असतात. टायर बाहेर आले की ते आपोआप चालू होतात. पण इथे टायरच बाहेर काढायचे नव्हते. त्यामुळे head lights चालूच होणार नव्हते. मग अंधारातच landing करण्याचे ठरले.मग बाकीचे सारे lights बंद करून तितकीच धावपट्टी उजळून काढली. संपूर्ण धावपट्टीवर आगविरोधक फोम टाकण्यात आले. त्याशिवाय फोम फवारा करणाऱ्या गाड्या आणि पाणी फवारणाऱ्या अग्नीशमन दलाच्या गाड्या धावपट्टीवर आणल्या. त्यांना विमान लँड होताच विमानासोबतच फवारणी करत धावायचे होते!केवळ दहा सेकंद बाकी होते. आणि तो संदेश आला. ‘The bird is landing’. इतकी विपरीत परिस्थिती असतानाही दोन्ही इंजिन्स बंद असतानाही कॅप्टन केसरीसिंग यांनी अगदी बरोबर अचूक, धावपतट्टीच्या मध्यभागी लँडिंग केले. Belly landing चे पण एक टेक्निक असते. त्यात विमान लँड होताच विशिष्ट अँगलने ठेवावे लागते. त्या टेक्निकचा वापर त्यांनी लँड होताच केला. विमान घसरत घसरत एक किलोमीटर पुढे गेले. त्याला समांतर अशा अग्नीशमन दल आणि फोम फवारणाऱ्या गाड्या त्याच वेगाने फवारणी करत धावत होत्या.अखेर विमान थांबले. पण फवारणी सुरूच होती. सारे श्वास रोखून पहात होते. विमानास आग लागली नव्हती! ना स्फोट झाला होता! मग हळूच दार उघडण्याचे आदेश दिले.
आतल्या रुग्णास प्रथम बाहेर काढण्यात आले. त्याची रवानगी रुग्णवाहिकेतून नानावटी रुग्णालयात झाली. मग प्रथम डॉक्टर, नातेवाईक उतरले. मग co pilot. आणि सर्वात शेवटी… कॅप्टन केसरीसिंग!!कॅप्टन केसरीसिंग यांच्याबरोबरच रविकांत अवला यांचेही कौतूक!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *