जिल्ह्यातील पूर बाधितांना तातडीने मदत द्या……
विधानसभा अध्यक्ष मा. ना. श्री नानाभाऊ पटोले यांचे निर्देश
भंडारा – गेल्या 20 व 21 ऑगस्ट रोजी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक गावांना पुराचा फटका बसला. शेतीतील पिकांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सर्व नुकसानग्रस्तांना तातडीने मदत देण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले. पूर बाधित गावांना मदत व बचाव कार्याचा विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी आज आढावा घेतला. पूर बाधितांना तातडीने मदत देण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. जिल्हा परिषद सभागृहात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. खासदार सुनील मेंढे, जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस., निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व विविध विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित ह…