जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समिती गठीत
Summary
जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समिती गठीत नागपूर जिल्ह्यासाठी जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीचे गठन करण्यात आले आहे. आज सोमवारी या संदर्भात गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त कार्यालयात पहिली बैठक घेण्यात आली. राज्यातील अंमली पदार्थाच्या वापरावर आळा घालण्यासाठी तसेच क्षेत्रीय […]
जिल्हास्तरीय अंमली पदार्थ
विरोधी कार्यकारी समिती गठीत
नागपूर जिल्ह्यासाठी जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीचे गठन करण्यात आले आहे. आज सोमवारी या संदर्भात गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त कार्यालयात पहिली बैठक घेण्यात आली. राज्यातील अंमली पदार्थाच्या वापरावर आळा घालण्यासाठी तसेच क्षेत्रीय स्तरावर प्रभावीपणे ही समस्या हाताळण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे.
पोलीस उपायुक्त चिन्मय पंडीत यांच्या अध्यक्षतेखाली आज या समितीची बैठक झाली. या बैठकीला समिती सदस्यांशिवाय सहायक पोलीस उपायुक्त रोशन पंडीत, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मनोज सिडाम उपस्थित होते. या समितीमध्ये – पोलीस आयुक्त किंवा जिल्हा पोलीस अधिक्षक – अध्यक्ष, सिमा शुल्क, केंद्रीय वस्तू व सेवा कर विभागाचे कार्यक्षेत्रिय सहायक आयुक्त, उपायुक्त – सदस्य, उपविभागीय दंडाधिकारी – सदस्य, जिल्हा शल्यचिकित्सक – सदस्य, नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरोचे (NCB) अधीक्षक (संबंधित) जिल्हा अधिकारक्षेत्र अधीक्षक – सदस्य, सहायक आयुक्त (औषधे) – सदस्य, राज्य उत्पादन शुल्क – सदस्य, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी – सदस्य, टपाल विभागाचे जिल्हास्तरीय प्रतिनिधी – सदस्य, जिल्हा माहिती अधिकारी – सदस्य उपस्थित होते.
वरील समितीची कार्यकक्षा व सदस्याचे काम पुढीलप्रमाणे असेल – जिल्ह्यातील अंमली पदार्थ विरोधी कारवाईचा नियमीत आढावा घेणे., जिल्ह्यात खसखस किंवा गांजा पिकाची अवैध लागवड होणार नाही याची दक्षता घेणे., Darknet व Courier च्या माध्यमातून अंमली पदार्थाची मागणी व पुरवठा होणार नाही याबाबत लक्ष ठेवणे., व्यसनमुक्ती केंद्रामध्ये व्यसनमुक्ती साठी दाखल झालेल्या व्यक्तीची संख्या व त्यांना कोणत्या अंमली पदार्थाची व्यसन आहे याबाबत माहिती प्राप्त करणे., Drugs Detection Kit व Testing Chemicals याची उपलब्धता सुनिश्चित करणे., जिल्हास्तरावर अंमली पदार्थ दुष्परीनामांबाबत जनजागृती अभियाने राबविणे., जिल्हा पोलीस NCB व राज्य उत्पादन शुल्क विभाग यांनी केलेल्या कारवाईची माहिती संकलित करुन त्याबाबतचा Database तयार करणे., एन.डी.पी.एस. अंतर्गत गुन्ह्याचे तपासी अधिकारी यांच्याकरीता प्रशिक्षण आयोजित करणे., जिल्हामध्ये अस्तित्वात असलेल्या रासायनिक कारखान्यांमध्ये (URN CHEMICAL COMPANIES) कोणत्याही प्रकारच्या अंमली पदार्थाचे उत्पादन होणार नाही याची दक्षता घेणे तसेच जे कारखाने बंद आहेत त्यावर विशेष लक्ष ठेवणे., Alprazolam, Clonazepam, Nitiazepam, Avil, Codin syp या औषधी घेण्याकरीता कोणी व्यक्ती आल्यास या औषधी डॉक्टरच्या सल्याशिवाय देवू नये तसेच डॉक्टरच्या सल्याने दिल्यास त्या व्यक्तीचे आधारकार्ड व संपूर्ण पत्ता व संपर्क नंबर रजिस्टरला नोंदविण्यात यावा, असे निर्देश दिले आहेत.
या समितीच्या माध्यमातून जिल्ह्यातील अंमली पदार्थाच्या सेवनाच्या व्यसनावर व वावरावर निर्बंध आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
00000